शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अखेर पेट्रोलने सांगलीत शतक झळकाविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 12:39 IST

petrol sangli-पेट्रोलच्या किंमतीनी सांगलीत अखेर शंभरी पार केली. सांगली-मिरज शहरांसह जिल्हाभरात पॉवर पेट्रोलची १००.१८ रुपये प्रतिलिटर या दराने विक्री सुरु झाली. साधे पेट्रोल ९७.३४ रुपयांवर पोहोचले. डिझेल ८७.०५ रुपयांनी विकले जात होते.

ठळक मुद्देअखेर पेट्रोलने सांगलीत शतक झळकाविले!पुन्हा दरवाढ ?

सांगली : पेट्रोलच्या किंमतीनी सांगलीत अखेर शंभरी पार केली. सांगली-मिरज शहरांसह जिल्हाभरात पॉवर पेट्रोलची १००.१८ रुपये प्रतिलिटर या दराने विक्री सुरु झाली. साधे पेट्रोल ९७.३४ रुपयांवर पोहोचले. डिझेल ८७.०५ रुपयांनी विकले जात होते.

गेल्या दशकभरातील या विक्रमी आणि उच्चांकी किंमती ठरल्या आहेत. राज्यभरात अन्यत्र पेट्रोलने यापूर्वीच शंभरी गाठली होती, पण सांगलीत मात्र आटोक्यात होते. साधे पेट्रोल गेले आठवडाभर ९५ रुपयांच्या आसपास घुटमळून रविवारी सकाळी ९७.३४ रुपयांवर पोहोचले.दररोजची पंधरा ते तीस पैशांची दरवाढ पाहता येत्या आठवड्यात तेदेखील शंभरी गाठण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत पॉवर पेट्रोलची विक्री पंप चालकांसाठी मोठीच डोकेदुखी ठरली आहे. ते खपविण्यासाठी तेल कंपन्यांकडून दबाव येत आहे, मात्र साध्या पेट्रोलच्या किंमतीचा भडका उडत असताना पॉवर पेट्रोल ग्राहकाला कसे पचनी पडेल? हा प्रश्न पंप चालकांपुढे आहे.इंधनाच्या वाढत्या किंमती सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून टाकत आहेत. डिझेल दरवाढीने मालवाहतुकीचे भाडे यापूर्वीच वाढले आहे, आता रिक्षा संघटनाही भाडेवाढीच्या पवित्र्यात आहेत. खासगी लक्झरी वाहतुकदारही जादा प्रवासी भाडे आकारणी करत आहेत. एसटीने अद्याप भाडेवाढ केलेली नसल्याने वडाप व्यावसायिकांनी अद्याप संयम राखला आहे.पुन्हा दरवाढ ?तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ व १५ तारखांना किंमतीचा आढावा घेतात. त्यानुसार सोमवारी (दि. १) इंधनाच्या किंमतीत पुन्हा काहीशी दरवाढ होऊ शकते. गॅसचे दर तीनच दिवसांपूर्वी २५ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत, त्यामुळे ते तुर्त स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.

 

 

टॅग्स :Petrolपेट्रोलSangliसांगली