शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
2
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
3
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
4
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
5
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
6
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
7
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
8
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
9
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
10
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
11
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
12
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
13
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
14
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
15
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
16
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
17
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
18
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
19
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
20
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

...अखेर काळवीटाला जीवदान

By admin | Updated: August 8, 2016 23:38 IST

जाधववाडीतील घटना : वन कर्मचारी व ग्रामस्थांनी विहिरीतून बाहेर काढले

खानापूर : जाधववाडी (ता. खानापूर) येथील डवरी मळ्यातील एका विहिरीत मोठे काळवीट पडल्याची घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. विहिरीत असणाऱ्या दहा फूट पाण्यामुळे काळवीट वाचले. रविवारी रात्री आठच्या सुमारास काळवीटास ग्रामस्थ व वन कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात यश आले. जाधववाडी (ता. खानापूर) येथील डवरी मळ्यात शंकर धोंडी कदम व बंधूची समाईक विहीर आहे. विहिरीत दहा फूट पाणी आहे. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जाधववाडी वन विभागाच्या हद्दीकडून एक मोठे काळवीट धावत आले व अचानक कदम यांच्या विहिरीत पडले. विहीर १२५ फूट खोल आहे. मात्र विहिरीत पाणी आहे. विहिरीतील पाण्यामुळे काळवीट बचावले. विहिरीत काही तरी पडल्याचा आवाज झाल्याने शेतातील लोक विहिरीकडे धावले. त्यावेळी त्यांना मोठी शिंगे असलेले काळवीट विहिरीत पोहत असल्याचे दिसले. ग्रामस्थांनी त्वरित वन विभागास माहिती देण्याचा प्रयत्न केला; मात्र अधिकाऱ्यांशी संपर्क न झाल्याने डवरी वस्तीवरील तरुणांनी विहिरीत दोर टाकून काळवीटास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अयशस्वी ठरला. सायंकाळी सहा वाजल्यानंतर वनरक्षक राजेंद्र कुंभार, सर्जेराव ठोंबरे व वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रात्री काळवीटास जिवंत विहिरीबाहेर काढले. या काळवीटास गाडीत घालत असताना ते ग्रामस्थ व वन कर्मचाऱ्यांच्या हातून निसटून पळून गेले. काळवीटाचे एक शिंग मोडले होते, तर एका शिंगाला जखम झाली होती. इतर कुठेही जखम झाली नव्हती.काळवीटास विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रल्हाद सावंत, दिलीप भोसले, उध्दव साळुंखे, बंडाजी कदम, बाळासाहेब कदम, शहाजी कदम, संभाजी कदम, वन कर्मचारी चंद्रकांत मंडले, तानाजी यादव, शरद पाटोळे व जोतिराम मंडले यांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)काळवीट आले कुठून? : ग्रामस्थांमध्ये चर्चाकाळवीट दुपारच्या वेळेस क से आले व कोठून आले? याबाबत ग्रामस्थांत चर्चा सुरू होती. काळवीट जाधववाडी वन विभागाच्या हद्दीकडून आले. त्याचा कुत्री पाठलाग करत होती. जीव वाचवताना त्याला रस्ता न समजल्याने ते चुकून विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांनी संगितले. परंतु जाधववाडी परिसरात काळवीट नाही. असेल तर काळवीटाचा कळप कसा दिसला नाही?, असाही प्रश्नही उपस्थित होत आहे. काहींच्या मतानुसार काळवीट सागरेश्वर अभयारण्यातून चुकून बाहेर पडले असावे व भटकत जाधववाडी शिवारात आले असावे.