याबाबत खानापूर पोलिसात बुधवारी रात्री उशिरा परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
फिर्यादी संजय विठ्ठल दीक्षित यांनी माणिक सुडके, आनंदा सुडके, यशवंत सुडके, गोपाल सुडके, जगन्नाथ रूपनर, जयवर्धन रुपनर, हर्षवर्धन रूपनर, दत्ता माने यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे, तर माणिक दाजी सुडके यांनी संजय दीक्षित, श्रीधर दीक्षित, शिवाजी माने, राजाराम माने, बापूराव माने, सिद्धनाथ माने, सचिन माने, सूर्यकांत माने, प्रतीक माने यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दोघांनीही परस्पराविरोधात शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीत शिवाजी भीमराव माने व यशवंत माणिक सुडके जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील व सुहास खुबीकर करत आहेत.