शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात यंत्रमागावर पंधरा टक्के बोनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 15:09 IST

विटा येथील यंत्रमाग कामगारांना यावर्षी दोन महिन्यांच्या पगाराएवढा म्हणजे १५ टक्के बोनस देण्याचा निर्णय यंत्रमाग उद्योजकांनी घेतला. यामुळे सहा हजार यंत्रमागांवर काम करणारे कामगार, वहिफनीवाले, जॉबर, घडीवाले, कांडीवाले, बिगारी अशा सुमारे दोन हजार कामगारांना बोनसरूपाने दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वाटप होणार असल्याने कामगारांत समाधानाचे वातावरण आहे. 

ठळक मुद्देकामगारांची दिवाळी चमचमीत दोन कोटी रुपयांचे वाटप संघर्षाला फाटा : एकमताने निर्णय

विटा , दि. १७ :  येथील यंत्रमाग कामगारांना यावर्षी दोन महिन्यांच्या पगाराएवढा म्हणजे १५ टक्के बोनस देण्याचा निर्णय यंत्रमाग उद्योजकांनी घेतला. यामुळे सहा हजार यंत्रमागांवर काम करणारे कामगार, वहिफनीवाले, जॉबर, घडीवाले, कांडीवाले, बिगारी अशा सुमारे दोन हजार यंत्रमाग कामगारांना बोनसरूपाने दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वाटप होणार असल्याने कामगारांत समाधानाचे वातावरण आहे. 

विटा शहरातील सुमारे सहा हजारांहून अधिक यंत्रमागावर दोन हजार कामगार काम करीत आहेत. त्यांचा दिवाळी सण गोड व्हावा, यासाठी बोनस देण्याचा निर्णय घेण्यासाठी विटा यंत्रमाग संघाच्या सभागृहात संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली.

बैठकीत अनेक यंत्रमागधारकांनी सांगितले की, दसरा किंवा दिवाळी जवळ आली की बोनससाठी कामगारांचा संप, मोर्चे, कामबंद आंदोलन असे प्रकार घडत आहेत. परंतु, विटा शहरातील यंत्रमागधारक गेल्या काही वर्षांपासून हा प्रश्न एक विचाराने संपवित आहेत. त्यामुळे कामगारांना बोनस देण्यासाठी एकमताने निर्णय घ्यावा. त्यानंतर कामगारांना दोन महिन्याच्या पगाराएवढा म्हणजे १५ टक्के बोनस देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. 

यामुळे यंत्रमाग कामगारांना सुमारे दोन कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याने कामगारांची दिवाळी चमचमीत होणार आहे. या बैठकीस दत्तोपंत चोथे, सुरेश म्हेत्रे, वैभव म्हेत्रे, शशिकांत तारळेकर, मधुकर म्हेत्रे, शिवाजी कलढोणे, विनोद तावरे, अनिल चोथे, राम तारळेकर, नितीन तारळेकर, कन्हैया शेंडे, मदन तारळेकर, धनंजय चोथे, सचिन रसाळ, राजन चौगुले, मिलिंद चोथे उपस्थित होते.

संघर्षाला फाटा : एकमताने निर्णयविटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर म्हणाले, विटा यंत्रमाग संघाच्या माध्यमातून शहरातील औद्योगिक शांतता टिकून राहण्यासाठी केलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नामुळे कामगार व यंत्रमाग उद्योजक यांच्यात परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणत्याही संघर्षाशिवाय  या ठिकाणी कामगार पगार, बोनस यासारखे निर्णय एकमताने घेतले जातात. कामगार व मालक यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाºयांना बोनस देण्याचे शासनाने बंद केले असतानाही विट्यातील यंत्रमागधारक कामगारांची दिवाळी चमचमीत होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

 

टॅग्स :diwaliदिवाळीIndian Festivalsभारतीय सण