शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली बाजार समितीत नेत्यांची फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 14:54 IST

शासनाच्या या धोरणानुसार आता पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमधून निवडलेले ११, ग्रामपंचायत सदस्यांमधून ४, अशा एकूण १५ शेतकरी प्रतिनिधींची निवड करण्याची तरतूद कायम ठेवण्यात येईल. या १५ सदस्यांबरोबर व्यापारी गटातून दोन आणि हमाल व तोलाईदार गटातून एक उमेदवार असणार आहे.

ठळक मुद्दे२०१५ च्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन आघाडी केली होती.

सांगली : बाजार समितीसाठी शेतकऱ्यांना दिलेला मतदानाचा हक्क महाविकास आघाडीच्या सरकारने हटविल्यामुळे ग्रामपंचायत, सोसायटीचे सदस्य, व्यापारी, हमाल-तोलाईदारच मतदार असतील. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जूनमध्ये होणार आहे. पण, या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. जत, कवठेमहांकाळ आणि मिरज हे तीन तालुके बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी भाजप सरकारने २०१७ मध्ये केलेली सुधारणा महाविकास आघाडीच्या सरकारने रद्द करून पूर्वीप्रमाणेच निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाच्या या धोरणानुसार आता पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमधून निवडलेले ११, ग्रामपंचायत सदस्यांमधून ४, अशा एकूण १५ शेतकरी प्रतिनिधींची निवड करण्याची तरतूद कायम ठेवण्यात येईल. या १५ सदस्यांबरोबर व्यापारी गटातून दोन आणि हमाल व तोलाईदार गटातून एक उमेदवार असणार आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांचा कार्यकाल जून २०२० मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील काही नेत्यांमध्ये राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. २०१५ च्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन आघाडी केली होती. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खा. राजू शेट्टी असे एक पॅनेल, तर विरोधी गटात जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, माजी आ. विलासराव जगताप, माजी मंत्री मदनभाऊ पाटील होते. पतंगराव कदम गटाला बहुमत मिळाल्यामुळे बाजार समितीवर त्यांचेच वर्चस्व होते. कालांतराने अनेक राजकीय समीकरणे बदलली आणि बाजार समिती खासदार संजयकाका पाटील गटाच्या ताब्यात गेली.

कदम, घोरपडे गटाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. या बदलत्या राजकारणाचा विचार करुनच जून २०२० मध्ये होणाºया निवडणुकीत आघाड्यांची गणिते मांडली जाणार आहेत. संजयकाका यांचा सध्या भाजपचे माजी आ. विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी काही प्रमाणात दुरावा निर्माण झाला आहे. हे दोन नेते येत्या बाजार समितीच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार याची आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.यामध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि कदम गट, मदनभाऊ गटाची काय भूमिका असणार, हेही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजार