शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलिसांनी सायबर गुन्ह्यांचाही अभ्यास करावा

By admin | Updated: June 1, 2016 00:56 IST

रवींद्रकुमार सिंंघल : तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत समारंभ

तासगाव : तंत्रज्ञानासोबत गुन्हेगारीचे तंत्रही बदलत आहे. त्यामुळे महिला पोलिसांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या जगात सायबर गुन्ह्यांचाही अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. संघटनकौशल्याचा वापर करुन पोलिस खात्याचे कामकाज उत्कृष्टपणे पार पाडावे, असे आवाहन प्रशिक्षण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंंघल यांनी केले.तुरची (ता. तासगाव) येथे मंगळवारी महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण संचालनालयांतर्गत पोलिस प्रशिक्षण केंद्रात दुसऱ्या सत्रातील महिला पोलिस शिपायांचा दीक्षांत समारंभ सिंंघल यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख सुनील फुलारी, प्रशिक्षण केंद्राचे माजी प्राचार्य डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, पोलिस उपअधीक्षक मा. शं. शिंंदे, प्रभारी प्राचार्य वि. तु. पांढरपट्टे उपस्थित होते.डॉ. सिंंघल म्हणाले, पोलिस दलाच्या ब्रीदवाक्यास शोभेल, अशा पध्दतीचीच कामगिरी महिला शिपायांनी करावी. पोलिसांची सर्व कामे सामुदायिक स्वरुपाची असतात. त्यामुळे उत्कृष्ट संघटनकौशल्य आत्मसात करुन काम करावे. पालकांनीही प्रशिक्षणार्थी महिला पोलिस शिपायांकडून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवावी. डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी अहवाल वाचन केले. यावेळी डॉ. सिंंघल यांच्याहस्ते महिला पोलिस शिपाई प्रशिक्षणार्र्थींनी तयार केलेल्या खुल्या व्यासपीठाचे उद्घाटन झाले. यावेळी विविध विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला. निरीक्षण व्हॅनमधून प्रशिक्षणार्थींना शपथ देण्यात आली. निशाण टोळीच्या संचलनाच्या राष्ट्रीय ध्वजाचे नेतृत्व प्रियंका झाल्टे यांनी केले, तर महाराष्ट्र पोलिस ध्वजाचे नेतृत्व आरती थिटे यांनी केले. प्रशिक्षणार्थी संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर जितू चौधरी यांनी केले. (वार्ताहर)तुरची येथे मंगळवारी महिला पोलिस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंंघल यांच्या उपस्थितीत पार पडला.