शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सागरेश्वरमधील बिबट्या मानवी जंगलात हरविण्याची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 17:35 IST

leopard, forest department, sangli सागरेश्वर अभयारण्यात बिबट्याचे आगमन झाल्याच्या बातमीने पंचक्रोशीत हौशी व उपद्रवी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. बिबट्यासोबतच वन विभाग आणि प्राणीप्रेमींसाठीही ही बाब चिंतेची बनू लागली आहे. दररोज रात्री या भागात प्रखर दिवे लाऊन रात्रभर वाहनांची वर्दळ सुरु झाली आहे.

ठळक मुद्देसागरेश्वरमधील बिबट्या मानवी जंगलात हरविण्याची भितीसागरेश्वर अभयारण्यात वन विभागाच्या कॅमेऱ्यात दिसलेला बिबट्या

सांगली : सागरेश्वर अभयारण्यात बिबट्याचे आगमन झाल्याच्या बातमीने पंचक्रोशीत हौशी व उपद्रवी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. बिबट्यासोबतच वन विभाग आणि प्राणीप्रेमींसाठीही ही बाब चिंतेची बनू लागली आहे. दररोज रात्री या भागात प्रखर दिवे लाऊन रात्रभर वाहनांची वर्दळ सुरु झाली आहे.बिबट्या व ग्रामस्थ यांच्या सहजीवनाविषयी वन विभागाच्या पुढाकाराने कार्यशाळा घेण्यात येत आहेत. प्राणीप्रेमींकडून जागृती केली जात आहे. कार्यशाळेदरम्यान प्रकर्षाने जाणवले की, दिड-दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर असतानाही त्याला फक्त तिघा-चौघांनीच प्रत्यक्ष पाहिले आहे. त्याने आतापर्यंत कोणाचेही पाळीव जनावर गायब केलेले नाही किंवा मारलेले नाही. तो माणसांना व मानवी वस्तीला टाळत आहे.बिबट्याविषयी अफवांचा मात्र सुळसुळाट झाला आहे. दररोज कोठे ना कोठे त्याला पाहिल्याच्या किंवा रस्त्यात आडवा आल्याच्या बातम्या पसरताहेत. त्याच्या खातरजमेसाठी ठिकठिकाणी कॅमेरे लाऊनही तो पुन्हा-पुन्हा दिसलेला नाही.

वन विभागाच्या कॅमेऱ्यांत एकदाच बिबट्या दिसल्या. वन विभागाच्या कॅमेऱ्यांत एकदाच दिसला. काही हौशी व अतिउत्साही ग्रामस्थ रात्रभर प्रखर प्रकाशझोताच्या दिव्यांसह दाट झाडीच्या रस्त्यावरुन फिरत आहेत. बाहेरुनही लोक येऊ लागल्याने गर्दी वाढली आहे. ही गर्दी निरुपद्रवी बिबट्यासाठी त्रासदायक ठरु शकते असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

रात्रीच्या अंधारात एक-दोन सेकंदांसाठी दिसलेला प्राणी कोणता आहे हे ठामपणे कोणीही सांगू शकलेले नाही. बिबट्या एका जागी फार काळ थांबत नसल्यानेही आठ कॅमेरे लाऊनही पुन्हा दिसलेला नाही.हरणे आणि साळींदरवर गुजराणहा बिबट्या मादी जातीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. सागरेश्वर अभयारण्यातील हरणे व साळींदरवर त्याची गुजराण सुुरु असावी. एरवी हरणांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी करणारे शेतकरी आता मात्र बिबट्याच्या अस्तित्वावर वन विभागाकडे दाद मागू लागले आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागSangliसांगली