शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

अडीच कोटी खड्ड्यात जाण्याची भीती

By admin | Updated: March 16, 2015 00:06 IST

इस्लामपुरातील रस्ते कामास प्रारंभ : निकृष्ट दर्जामुळे पवार बंधू-सत्ताधाऱ्यांत संघर्ष

अशोक पाटील - इस्लामपूर शहरातील प्रमुख सात रस्त्यांचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यासाठी पालिका प्रशासनाने अडीच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हे काम युनिटी बिल्डर्सला देण्यात आले आहे. यातील काही रस्तेकाम पूर्णत्वाला आले आहे, तर काही रस्त्यांचे काम सुरु आहे. ही कामे निकृष्ट होत आहेत, म्हणून एम. डी. पवार यांचे नातू वैभव पवार आणि विजय पवार रस्त्यावर उतरले आहेत. ठेकेदाराकडून कराराची पायमल्ली होत असल्याचा आरोप पवार बंधूंचा असून, जुजबी होणारे काम बंद पाडले जात आहे. या विरोधाला न जुमानता सत्ताधारी हे काम पूर्ण करीत आहेत. त्यामुळे रस्ते करण्यासाठी आलेला निधी खड्ड्यात जाणार आहे.शहरातील भुयारी गटार योजनेची घोषणा हवेतच विरली आहे. भुयारी गटार योजना होण्याअगोदरच प्रमुख सात रस्त्यांचे काम युनिटी बिल्डरला देण्यात आले आहे. या ठेकेदाराने रस्ते करताना पालिकेबरोबर केलेल्या कराराला केराची टोपली दाखवून, निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. यावर काँग्रेसचे वैभव पवार व त्यांचे बंधू विजय पवार यांनी रस्त्यावर उतरून होणाऱ्या या निकृष्ट कामाला अटकाव केला आहे. काम बंद पाडले जात असले तरी, चांगल्या दर्जाचे काम होण्यासाठी शेवटपर्यंत लढा दिला जात नाही. त्यामुळे सत्ताधारी ताकदीच्या जोरावर निकृष्ट कामे पूर्ण करुन घेत आहेत.सध्या आष्टा नाका ते तहसील कार्यालय, आष्टा नाका ते संभूआप्पा मठ, शाळा नं. १ ते मुरारराव शिंदे यांचे घर, शिराळा नाका ते मोमीन मोहल्ला, उर्दू शाळा ते जयहिंद चित्रपटगृहापर्यंत, झरी नाका ते संभाजी चौक, यल्लम्मा चौक, शिराळा नाका ते गणेश मंदिर, कापूसखेड नाक्यापर्यंत, यल्लम्मा चौक ते जुन्या बहे नाक्यापर्यंत अशा एकूण ७ रस्त्यांवर पालिका प्रशासन अडीच कोटी खर्ची टाकणार आहे.त्यापैकी शिराळा नाका, गणेश मंदिर, कापूसखेड नाका रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. परंतु १५ दिवसातच हा रस्ता उखडला असल्याचा आरोप वैभव पवार यांनी केला आहे. एकंदरीत पवार बंधू काँग्रेसचे असल्याचे मानले जाते. त्यांचे आजोबा एम. डी. पवार यांची इस्लामपूर पालिकेवर २५ वर्षे सत्ता होती. ही सत्ता उरुण परिसरातील पाटील भावकीने संपुष्टात आणली. तेव्हापासून सत्ताधाऱ्यांचे नेतृत्व पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील करीत आहेत. त्यामुळे की काय, वैभव पवार आणि विजय पवार यांनी निकृष्ट दर्जाच्या रस्तेकामावरुन पाटील यांना टार्गेट केले आहे. या दोघांच्या आंदोलनाला भाजप, शिवसेना यांचा जुजबी पाठिंबा असल्याने सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करुन रस्त्याचे काम सुरुच ठेवले आहे.१९८५ पासून पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी गोड बोलून प्रत्येकाचा कार्यक़्रम केला आहे. सत्ताधाऱ्यांतील जे जे विद्यमान आणि माजी नगरसेवक त्यांच्या नादाला लागले आहेत, त्यांची अवस्था काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.- वैभव पवार, माजी नगरसेवक.ठेकेदाराकडून कराराला केराची टोपलीमुळातच इस्लामपूर शहरातील भुयारी गटर योजनेची घोषणा हवेतच विरली आहे. त्यापूर्वी सुरु करण्यात आलेल्या सात रस्त्यांचे काम युनिटी बिल्डर्स या ठेकेदार कंपनीने अत्यंत निकृष्ट दर्जाचे करत पालिकेबरोबर केलेल्या कराराला केराची टोपली दाखवली आहे. यामुळेच पालिकेत सत्ताधारी व विरोधकांतील संघर्ष वाढला आहे.