शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

दुष्काळी स्थितीत पशुखाद्यांच्या किमती भडकल्या-; दुग्ध व्यवसाय आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 19:44 IST

सांगली : जिल्ह्यातील जनता दुष्काळामध्ये होरपळत असताना, पशुखाद्य कंपन्यांनी पशुखाद्यांच्या किमतीमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपयांची वाढ करून श्ेतकऱ्यांचे ...

ठळक मुद्देक्विंटलला पाचशे ते हजार रुपये वाढ

सांगली : जिल्ह्यातील जनता दुष्काळामध्ये होरपळत असताना, पशुखाद्य कंपन्यांनी पशुखाद्यांच्या किमतीमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपयांची वाढ करून श्ेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. पशुखाद्यांच्या किमती वाढल्या असताना दुधाच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक दुहेरी संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र पाणी व चाराटंचाई निर्माण झाली आहे. आता पशुखाद्याच्या कच्च्या मालाच्या किमतीत वर्षभरात दुपटीने वाढ झाली आहे. ही दरवाढ पशुपालकांना झेपणारी नाही. यामुळे दुधाच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. येणाºया खरीप हंगामापर्यंत या किमती अशाच राहण्याची शक्यता व्यावसायिक वर्तवित आहेत.

गतवर्षी मक्याचा दर १२०० ते १४०० रुपये क्विंटल होता. यात वाढ होऊन यावर्षी दर प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये झाला आहे. सरकी १७०० रुपये क्विंटलवरून ३२०० रुपये क्विंटलवर पोहोचली आहे. शेंग पेंडचे दर प्रतिक्विंटल ३००० रुपयांवरून ४००० रुपयांवर पोहोचले आहेत. गहू चुरी १५०० रुपये क्विंटलवरून २२०० रुपये क्विंटलवर पोहोचली. गुळी पेंडीचा दर २८०० रुपये क्विंटलवरुन ३००० रुपये झाला आहे. सुग्रास हा पौष्टिक आहार १६०० रुपयांवरून २००० रुपये प्रतीक्विंटलवर पोहोचला आहे. पुढील काळात या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.दूध उत्पादनात घटपशुखाद्यांचे सध्याचे दर पशुपालकांना परवडणारे नाहीत. या स्थितीत गोपालकांना जनावरांसाठी आहार पुरविणे अवघड झाले आहे. ओला चाराही उपलब्ध होत नाही. त्यामुळे दूध उत्पादनही घटले आहे. पशुखाद्यांच्या किमती वाढल्याने दुधाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता दूध डेअरीचालक वर्तवित आहेत. मात्र काही दूध डेअरीचालकांनी वाढीव दराबाबत मौन पाळल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :foodअन्नSangliसांगली