तासगाव : येथील कस्तुरबा हॉस्पिटल एका महिन्यात सुरू करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही तीन महिन्यात त्याचे काम होत नाही. येत्या दहा दिवसात काम पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे यांनी दिला आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की, १ मे रोजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महिन्यात तासगावचे कस्तुरबा हॉस्पिटल चालू करू, असे आश्वासन दिले होते. परंतु, गेले तीन महिने कोविड हॉस्पिटल चालू झाले नसून, नगरपालिका व जिल्हा प्रशासनाने खासगीकरणाचा घाट घातला आहे. यामुळे गोरगरीब जनतेची लूट होणार असून, कस्तुरबा हॉस्पिटल तत्काळ मिरज वैद्यकीय हॉस्पिटलच्या ताब्यात द्यावे व कोविड हॉस्पिटल सुरु करावे. हॉस्पिटल सुरू न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.