शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

शेतकऱ्यांच्या मुलांनो, स्वत:पुरते पाहणे थांबवा!

By admin | Updated: September 3, 2016 01:04 IST

अमर हबीब : शेतकरी संघटनेचा सांगलीत मेळावा

सांगली : आज शेतकऱ्यांची मुले शिकून गाव सोडून शहरात राहण्यास जात असून, त्यांनी स्वत:चे विश्व तयार केले आहे. याच्या बाहेर पाहण्यास ते तयार नसल्यानेच शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांनी आपल्यापुरताच विचार न करता शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करावा, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे मार्गदर्शक अमर हबीब यांनी शुक्रवारी येथे केले. शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. प्रकाशराव जाधव होते. हबीब म्हणाले की, सरकारविरोधात आणि शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या धोरणाविरोधात लढा देण्याचे बळ शरद जोशी यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांना दिले. महात्मा फुले यांनी, बहुजनांची मुले शिकली तर ती नक्कीच समाजाचे ऋण फेडतील, असा विचार मांडला होता. मात्र, असे होताना दिसत नाही. शेतकऱ्यांची मुले शिकून मोठी झाली, पण ती शेतकऱ्यांना विसरली आहेत. शहरात राहणारा हा वर्ग संघटनेच्या पाठीशी राहिला, तरच शेतकऱ्यांचे दुखणे कमी होणार आहे. सिलिंग, अत्यावश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहण कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे. मूलभूत अधिकारातून मालमत्तेचा अधिकार काढून टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. देशात वाढलेला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी लोकपाल कायद्याची आवश्यकता नाही, तर शासनाने निर्माण केलेल्या अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द केला, तर ९० टक्के भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होणार असल्याचेही अमर हबीब यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, छायाचित्रकार यांना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले. संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील, शेतकरी सेनेचे बाळासाहेब कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकर गोडसे, जयपाल फराटे, अच्युत गंगणे, पुंडलिकराव जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची ‘व्होट बँक’ अशक्यशेतकऱ्यांची ‘व्होट बँक’ करण्याविषयी अनेकजण मत व्यक्त करत असले तरी, ते आता शक्य नाही. कारण मतदार संघाच्या पुनर्रचनेमुळे नागरी मतदारांत वाढ झाली आहे. त्यामुळे शिवरायांच्या गनिमी काव्यानुसार आता संघटनेला शहरात घुसावे लागणार आहे व नागरी मतदारांसमोर समस्या व हेतू मांडावा लागणार असल्याचेही हबीब यांनी सांगितले.सरकार हे शत्रूच!सरकार हे शेतकऱ्यांचे शत्रू असते. अशी शिकवण शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली होती. त्यामुळेच कार्यकर्ते शासकीय धोरणाच्या विरोधात पोटतिडकीने लढा उभारून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतात, असे हबीब म्हणाले.