शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा ठिय्या सुरूच

By admin | Updated: July 7, 2015 23:28 IST

दुसरा दिवस : ४२ गावांना विविध संघटनांचा पाठिंबा

सांगली : जत पूर्व भागातील ४२ गावांतील शेतकऱ्यांचा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश करून त्यांच्या शेतीला पाणी द्यावे, या मागणीसाठी मंगळवारी दुसऱ्यादिवशी ठिय्या आंदोलन सुरूच राहिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. दरम्यान, विविध पक्ष, संघटनांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. जत पूर्व भागातील उमदीसह ४२ गावे गेल्या ३२ वर्षांपासून दुष्काळात होरपळत आहेत. या गावांचा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश करून शेतीला पाणी द्यावे, अन्यथा सरकारने कर्नाटकात जाण्याचे ‘ना हरकत’ पत्र द्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. त्यासाठी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, उपाध्यक्ष अनिल शिंदे, दावल शेख, निवृत्ती शिंदे, संजय तेली, राजू चव्हाण, मल्लिकार्जुन सुरगोंड, मानसिध्द शिरगट्टी, संगू गवळी, रोहिदास सातपुते, चिदानंद आवटी, संतोष गुरव, हरिष शेटे, भीमू नागोंड, काशिलिंग बिराजदार, चंद्रकांत नागणे, महंमद कलाल यांच्या नेतृत्वाखाली उमदी ते सांगली पदयात्रेने सांगलीत येऊन येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनस्थळी माजी महापौर सुरेश पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, वकील संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पवार, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पाटील, मल्लिकार्जुन कलशेट्टी, मराठा सेवा संघाचे महादेव साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, संभाजी सरगर आदींनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांची भेटलघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी सचिन पवार व सुभाष घोलप यांनी मंगळवारी दुपारी आंदोलनस्थळी भेट दिली. ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी बैठक बोलावली असून, यामध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे. तुम्ही आंदोलन मागे घ्या, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनकर्त्यांनी यास ठाम नकार दिला. या बैठकीकडे लक्ष लागले आहे.