कुरळप : आपण उसाच्या पिकाला पाटपाणी पध्दतीने एकरी ४ लाख लिटर पाणी देतो. मात्र प्रगत देशात पाण्याचे महत्व ओळखून कमी पाण्यात व कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जादा उत्पन्न घेतले जात आहे. कमी पाणी व कमी खर्चात उत्पादन वाढीसाठी गट शेती, ठिबक सिंचन व ड्रोनद्वारे औषध फवारणी आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा,असे आवाहन युवा नेते प्रतीक पाटील यांनी कुरळप येथे केले.
प्रतीक पाटील यांनी कुरळप व परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष पी. आर.पाटील, जि. प. सदस्य संजीव पाटील, पं. स. सदस्य पी. टी. पाटील, धनश्री माने, दूध संघाचे संचालक व्ही. एन. पाटील, बँकेचे संचालक शहाजी गायकवाड, प्रशांत पाटील प्रमुख उपस्थित होते. राजारामबापू पाटील सह.साखर कारखान्याच्या वतीने ‘उच्च तंत्रज्ञान गटशेती व ठिबक सिंचन योजना’ अंतर्गत या परिसंवादाचे आयोजन केले होते.
अध्यक्ष पी.आर.पाटील म्हणाले, आज प्रतीक पाटील हे गावोगावी जाऊन क्षारपड जमिनी,ठिबक सिंचन,उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. पुन्हा एकदा तालुक्यात दुसरी क्रांती घडणार आहे.
यावेळी सुभाषराव जमदाडे,ऊस विकास अधिकारी सुजय पाटील यांनी ठिबकची योजना व ड्रोनद्वारे फवारणी,गटशेतीबद्दल मार्गदर्शन केले. अतुल पाटील यांनी ड्रोनद्वारे औषध फवारणीची माहिती दिली. के.डी.पाटील यांनी सूत्रसंचलन केले. प्रदीप वरपे यांनी आभार मानले.
फोटो ओळी-०७०२२०२१-आयएसएलएम-कुरळप न्यूज
कुरळप येथे प्रतीक पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पी. आर.पाटील, संजीव पाटील, सुभाषराव जमदाडे, व्ही. एन. पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.