येलूर : ऊस पिकांना जास्त पाणी दिल्याने जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. ऊस पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन त्याचबरोबर जमिनीचा पोत चांगला ठेवायचा असेल तर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे, असे मत युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले.
येलूर (ता. वाळवा) येथे राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित शेतकरी परिसंवादात ते बोलत होते.
प्रतीक पाटील म्हणाले, ठिबक सिंचनाबरोबरच उसाला औषध फवारणी करायचे असेल तर ड्रोनच्या साहाय्याने करावी. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचतो.
या वेळी कारखान्यांमार्फत सभासदांना ठिबक सिंचनासाठी अनुदान देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अधिकारी सुभाष जमदाडे यांनी सांगितले. ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक प्रगतीशील शेतकरी दीपक गायकवाड यांच्या ऊस क्षेत्रावर करण्यात आले.
या वेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक दिलीपराव पाटील, युवराज सूर्यवंशी, धनाजीराव पाटील, शिवाजीराव पाटील, जे.टी. महाडिक, अशोकराव पाटील, भगवानराव जाधव, भास्करराव जाधव, संदीप जाधव, सुजय पाटील, अमोल पाटील उपस्थित होते.
फोटो फोटो -०२०२२०२१-आयएसएलएम- येलूर परिसंवाद न्यूज
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी परिसंवादात शेतकऱ्यांना प्रतीक पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी दिलीपराव पाटील, युवराज सूर्यवंशी उपस्थित होते.