शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेने ऊसतोड रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:04 IST

मिरज : उसाला पहिला हप्ता साडेतीन हजार रुपये व अंतिम दर साडेचार हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने वड्डी (ता. मिरज) येथे ऊसतोड रोखली.मिरज तालुक्यातील वड्डी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोरे व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोबरे यांच्या शेतात सुरू असलेली ऊसतोड बंद पाडली. कर्नाटकातील शिवशक्ती कारखान्याच्या ऊसतोड कामगारांना पिटाळून ...

मिरज : उसाला पहिला हप्ता साडेतीन हजार रुपये व अंतिम दर साडेचार हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने वड्डी (ता. मिरज) येथे ऊसतोड रोखली.मिरज तालुक्यातील वड्डी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोरे व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोबरे यांच्या शेतात सुरू असलेली ऊसतोड बंद पाडली. कर्नाटकातील शिवशक्ती कारखान्याच्या ऊसतोड कामगारांना पिटाळून लावण्यात आले. ऊसतोड मुकादमाकडून, ऊसतोड करणार नाही, अशी हमी घेण्यात आली. उसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी व अंतिम दर ४५०० मिळावा, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकºयाच्या उसाला आधारभूत किंमत मिळेपर्यंत उसाचे एक कांडेही कारखान्यांना नेऊ देणार नसल्याचे महादेव कोरे यांनी सांगितले. उसाला दर मिळावा, राज्यबंदी व अंतराची अट रद्द करावी यासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कोरे यांनी दिला. कमलेश्वर कांबळे, किरण पाटील, गुंडू जतकर, नानासाहेब काणे, प्रदीप कार्वेकर, सुरेश आंबी, शशिकांत गायकवाड, अरुण क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.रविवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक आंदोलन करीत ऊस तोड बंद पाडल्याने, पोलीस याबाबत अनभिज्ञ होते. मिरज परिसरातील अनेक गावांत कर्नाटकातील कारखान्यांच्या ऊसतोड टोळ्या आल्या असून, शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे ऊसतोड थांबणार आहे. ऊस दर जाहीर होईपर्यंत ऊस वाहतूक रोखण्याचा इशारा देण्यात आला असल्याने रात्रीच्यावेळी प्रमुख मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जबरदस्तीने ऊसतोड व वाहतूक रोखणाºयांवर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला असल्याने ऊस दरासाठी संघर्षाची चिन्हे आहेत.

टॅग्स :Strikeसंप