शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी मैदान सोडलेलेच नाही! अजित नवले : सांगलीत किसान सभेचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:41 IST

सांगली : महामुक्काम आंदोलन, तिरडी मोर्चा, शेतकरी संप, लाँग मार्चनंतर राज्यातील भाजप सरकारने शेतकºयांच्या मागण्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

सांगली : महामुक्काम आंदोलन, तिरडी मोर्चा, शेतकरी संप, लाँग मार्चनंतर राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पण आता दोन महिने उलटले तरी, या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. भाजपने पुन्हा आपला रंग दाखविण्यास सुरूवात केली असली तरी, शेतकऱ्यांच्या पोरांनी अजून मैदान सोडलेले नाही, अशा शब्दात सरकारवर हल्ला चढवत, शेतकरी संपाच्या वर्षपूर्ती दिनापासून पुन्हा आंदोलन हाती घेत असल्याचे किसान सभेचे राज्य सरचिटणीस अ‍ॅड. अजित नवले यांनी सोमवारी सांगितले.

सांगलीत मराठा सेवा संघाच्या सभागृहात किसान सभेचा मेळावा झाला, यावेळी नवले बोलत होते. या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, राज्य सचिव दिगंबर कांबळे, कमिटी सदस्य सुभाष निकम, अरुण माने उपस्थित होते.नवले म्हणाले की, भाजपने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकरी संप व लाँग मार्चवेळी सरकारने शेतकºयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी दीड महिन्याचा कालावधीही मागून घेतला. पण आता दोन महिने झाले तरी आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. कर्जमाफीच्या निकषात बदल केले, पण सरसकट कर्जमाफीचा प्रश्न निकाली निघालेला नाही. अजून २०१७ मधील थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुणांना नोकºया नाहीत. शेती परवडत नाही, म्हणून तोही आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांची ही हतबलता संपवून, त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, यासाठी किसान सभेने लढा हाती घेतला. सरकारच्या धोरणाचीच तिरडी उचलण्याचे आंदोलन केले. ४० हजार शेतकºयांनी लॉँग मार्चमध्ये सहभाग घेत एल्गार पुकारला, तेव्हा कुठे सरकारला जाग आली. पण आंदोलन थंडावताच पुन्हा सरकारने रंग दाखविण्यास सुरूवात केली आहे. शेतकºयांचा विश्वासघात करणाºया सरकारविरोधात पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकºयांच्या पोरांनी अजून मैदानातून पळ काढलेला नाही. येत्या १ जूनला शेतकरी संपाला वर्ष पूर्ण होत आहे. संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दूध दर यासह विविध मागण्यांसाठी यादिवशी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाला घेराव घालणार आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्ह्यातील शेतकºयांनी देवस्थान जमिनीचा प्रश्न मांडला. शासनाने या जमिनी काढून घेण्याचा डाव आखला असून त्याविरोधात एकत्रित संघर्ष करण्याचा निर्धारही मेळाव्यात केला. या मेळाव्याला खंडेराव वाघचौरे, गुलाब मुलाणी, गवस शिरोळकर, सुदर्शन घेरडे, रियाज जमादार, सुधीर गावडे, कुमार सकळे आदी उपस्थित होते.लबाडांना : ग्लास भरून दूधदुधाला लिटरमागे २७ रुपये दर मिळावा, यासाठी ३ ते ९ मेदरम्यान मोफत दुधाचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गुजरातहून मोदी ग्लास मागवावेत. हे ग्लास बाहेरून ५६ इंचाचे दिसत असले तरी, आतमध्ये ५६ थेंबही दूध मावत नाही. या लबाडांना ग्लास भरून दूध दिले तरी ते सुधारणार नाहीत, असा टोलाही नवले यांनी लगाविला.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण