शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोकरुड येथे शेतकºयास पोलिसाची मारहाण--गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 21:50 IST

कोकरुड : येथील पोलिस ठाण्याजवळील माळावर जनावरे चरण्यास घेऊन आलेल्या एका शेतकºयास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल झाली आहे.

ठळक मुद्दे: घटनेच्या निषेधार्थ कोकरुड, माळेवाडीत आज बंद इकडे जनावरे का चरायला आणला आहेस’ असे म्हणत त्याच्या कानशिलात लगावल्या. मग मोकळ्या जागेत गुरे चरल्यानंतर कोणाला मारण्याचा, शिवीगाळ करण्याचा अधिकार कोणी दिला,

लोकमत न्यूज नेटवर्ककोकरुड : येथील पोलिस ठाण्याजवळील माळावर जनावरे चरण्यास घेऊन आलेल्या एका शेतकºयास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल झाली आहे. माळेवाडीतील शेतकरी केरू महादेव जाधव (वय ७८) यांनी फिर्याद दिल्यानंतर तसेच ग्रामस्थांच्या दबावानंतर शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकारणाच्या निषेधार्थ गुरुवार, दि. १४ सप्टेंबर रोजी कोकरुड व माळेवाडी येथे बंद पुकारण्यात आला आहे.

माळेवाडी-कोकरुड येथील वयोवृध्द शेतकरी केरू महादेव जाधव हे कोकरुड पोलिस स्टेशनच्या लगत असणाºया माळावर बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास जनावरे चरावयास घेऊन गेले होते. जनावरे चरत असताना पोलिस स्टेशनच्या दोन कर्मचाºयांनी जाधव यास साहेब बोलावत असल्याचे सांगितले. त्यानंतर केरू जाधव पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी भगवान शिंदे यांनी ‘ये थेरड्या, इकडे जनावरे का चरायला आणला आहेस’ असे म्हणत त्याच्या कानशिलात लगावल्या. यामुळे जाधव जमिनीवर कोसळले.हा प्रकार काही ग्रामस्थांनी पाहिला व त्यांनी गावात याबाबतची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर कोकरुड व माळेवाडी येथील सर्व आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याच्या आवारात धाव घेतली. त्यावेळी जाधव हे चक्कर येऊन पडल्याचे सांगण्यात आले. यावर लोकांचा विश्वास न बसल्याने जाधव यांच्याकडून माहिती घेतली असता, शिंदे यांनी मारहाण आणि शिवीगाळ केली. यामुळेच आपण बेशुध्द पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यानंतर शिंदे यांच्याकडे विचारणा केली; मात्र त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली नसल्याचे सांगितले. शिंदे हे खोटे बोलत असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांनी दोन तास घेराव घातल्यानंतर शिंदे यांच्यावर त्यांच्याच पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी काही ग्रामस्थ म्हणाले, शिंदे यांनी कोकरुड येथील चौगुले गल्लीतील दोन महिलांना आठवड्यापूर्वी असेच कारण नसताना मारहाण केली आहे. कोकरुड पोलिस ठाण्याला देशमुख कुटुंबियांनी मोफत जागा दिली आहे. ही जागा पोलिस ठाण्याच्या मालकीची नाही. पोलिस ठाण्याच्या बाहेरील जागा कोकरुड गावची आहे. यामध्ये शिंदे यांचा काहीही संबंध नाही. मग मोकळ्या जागेत गुरे चरल्यानंतर कोणाला मारण्याचा, शिवीगाळ करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही उपस्थित केला. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार, दि. १४ रोजी कोकरुड व माळेवाडी बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकासराव देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख अनिल घोडे, माजी तालुकाप्रमुख संजय घोडे, माजी सरपंच संजय जाधव यांच्यासह ग्रामस्थ, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.