शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
5
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
6
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
7
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
9
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
10
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
12
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
13
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
14
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
15
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
16
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
17
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
18
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
19
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
20
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

शेतकरी चार महिने भरपाईच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 17, 2015 00:06 IST

जत पूर्व भाग : द्राक्ष, डाळिंब बागायतदार हवालदिल; पंचनाम्यांचा नुसताच फार्स...

राहुल संकपाळ - उमदी जत पूर्व भागात नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जत पूर्व भागातील उमदी, हळ्ळी, बालगाव, बोर्गी, मोरबगी, करजगी, बेळोंडगी, सोनलगी, सुसलाद, माणिकनाळ अशा अनेक गावांतील द्राक्ष व डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या बागांचे ग्रामसेवक, तलाठी व कृषी अधिकारी यांनी पंचनामे केले. परंतु पंचनामे करून व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन चार महिने पूर्ण झाले तरी, अद्याप शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी बागा जगविण्यासाठी बॅँकेकडून अथवा सावकारांकडून कर्जे काढली आहेत. परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक वाया गेल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. त्यातच मार्चअखेर असल्याने अनेक बॅँकांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावला आहे. एकीकडे पिकांचे नुकसान, तर दुसरीकडे कर्जफेड, या गोष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी नुकसान भरपाईची प्रतीक्षा करीत आहेत. निवडणुकीपूर्वी अनेक लहान-मोठ्या मागण्यांसाठी अनेक राजकीय नेते व पक्ष रस्त्यावर उतरले होते. परंतु निवडणूक झाल्यानंतर मात्र, शेतकऱ्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील जत पूर्व भागातील एकही राजकीय पक्ष अथवा नेता याबद्दल बोलून रस्त्यावर उतरायला तयार नाही. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी पंचनामे तयार केले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई लवकर द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. नेतेमंडळींची पाठ...निवडणुकीपूर्वी अनेक लहान-मोठ्या मागण्यांसाठी अनेक राजकीय नेते व पक्ष रस्त्यावर उतरले होते. परंतु निवडणूक झाल्यानंतर मात्र, शेतकऱ्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील जत पूर्व भागातील एकही राजकीय पक्ष अथवा नेता याबद्दल बोलून रस्त्यावर उतरायला तयार नाही.