शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील खुंदलापूर येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

By संतोष भिसे | Updated: May 28, 2024 17:05 IST

आनंदा सुतार वारणावती : खुंदलापूर (ता. शिराळा) येथे गव्याच्या हल्ल्यात ठकुजी गंगाराम शेळके (वय ६५) हा शेतकरी गंभीर जखमी ...

आनंदा सुतारवारणावती : खुंदलापूर (ता. शिराळा) येथे गव्याच्या हल्ल्यात ठकुजी गंगाराम शेळके (वय ६५) हा शेतकरी गंभीर जखमी झाला. चांदोली अभयारण्याच्या सीमेवर खातवाड नामक खासगी मालकीच्या शेतात आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. ठकुजी शेळके जनावरे चरायला सोडण्यासाठी गेले असता पाठीमागून आलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला.गव्याने शेळके यांना शिंगावर उचलून शेतात फेकून दिले. त्यात त्यांच्या पाठीत खोल जखम झाली आहे. हल्ल्यावेळी शेजारीच घरात काम करीत असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने गवा डोंगराच्या दिशेने पळून गेला. जखमी शेळके यांना खासगी वाहनातून मणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा पाटील यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. पोलिस पाटील धाकलू गावडे यांनी गव्याच्या हल्ल्याची माहिती वन विभागास दिली. त्यानंतर वनपाल व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठांना कळविले. वन विभागाने पुढील उपचारांसाठी शासकीय वाहनातून कराड येथील कृष्णा रुग्णालयात पाठविले.दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच माजी सरपंच वसंत पाटील, सावळाराम पाटील, राम माने आदींनी घटनास्थळी धाव घेतली. गव्याच्या हल्ल्यामुळे खुंदलापूर व मणदूर परिसरात भितीचे वातावरण आहे. खुंदलापूर  परिसरात मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधता आला नाही. जखमी शेळके यांना खासगी वाहनातून मणदूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागले.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग