शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कवठेएकंदला कायद्याच्या चौकटीतच आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:01 IST

कवठेएकंद : यात्रेचा उत्सव लोकांच्या भावना आणि श्रध्देसाठी आहे. लोकांना सोबत घेऊनच उत्सव साजरा करताना, काहीबाबतीत भावनांना मुरड घालावी. ...

कवठेएकंद : यात्रेचा उत्सव लोकांच्या भावना आणि श्रध्देसाठी आहे. लोकांना सोबत घेऊनच उत्सव साजरा करताना, काहीबाबतीत भावनांना मुरड घालावी. शासनाचे नियम लोककल्याणासाठीच आहेत. तरी नियमांच्या चाकोरीतच यात्रा व्हावी, यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी कवठेएकंद येथे दसरा बैठकीत बोलताना केले.कवठेएकंद येथे विजयादशमीला ग्रामदैवत श्री बिºहाडसिध्द देवस्थानचा पालखी सोहळा व त्यानिमित्ताने होणाऱ्या आतषबाजीसाठीची नियोजन बैठक प्रशासनाच्यावतीने सिद्धराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, तहसीलदार दीपक वजाळे, पोलीस निरीक्षक अजय शिंदकर, सरपंच राजश्री पावसे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. खरात म्हणाले की, आतषबाजी करताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी प्रत्येक ग्रामस्थाने घ्यावी. रितसर परवाने घेऊनच आतषबाजी करा. लाकडी शिंगटे सादरीकरण एकाचठिकाणी गतवर्षीप्रमाणे करावे. धोकादायक प्रकार वगळून दारूकाम करून लोकांनी सहकार्य करावे. प्रशासन आपल्याबरोबर असेलच. उपाययोजना, बंधने ही आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत. नियमात राहून उत्सव साजरा केला जावा. उल्लंघन करणाºयांवर कारवाई होईल, असेही ते म्हणाले. सर्वच विभागांच्या अधिकाºयांना, कामात कसूर करू नका, अशा सूचनाही त्यांनी केल्या. नियमानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे सांगून, सामाजिक भान ठेवून यात्रा अधिक चांगल्याप्रकारे करण्यासाठी ग्रामस्थ, यात्रा कमिटी, भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.तहसीलदार दीपक वजाळे, पोलीस अधिकारी अशोक बनकर, मनोज पाटील, रामचंद्र थोरात, देवस्थान ट्रस्टचे सदस्य, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.दसºयाच्या पार्श्वभूमीवर लाकडी शिंगटे पोखरणे, दारूकाम कच्चे साहित्य जमवणे, अशा पूर्वतयारीला गती मिळाली आहे.दसरा कामाला गती...प्रशासनाच्या नेमक्या भूमिकेनंतर ठिकठिकाणच्या दारूशोभा मंडळांच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली. प्रशासनाच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा होती. परंतु शासनाने कडक धोरण न स्वीकारता ‘गोड औषधी भूमिका’ घेऊन ग्रामस्थ व शासन असा एकत्रितपणे आतषबाजीचा उत्सव सुरक्षित, शांततेत पार पाडण्यात सहकार्य करा, असे आवाहन करून नागरिकांनीच शासनाचे काम करावे, अशी भूमिका मांडली.