शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

बेळुंखीत पन्नास हजारचा गांजा जप्त

By admin | Updated: April 8, 2016 00:08 IST

दोघा भावांना अटक : जतमध्ये कारवाई

जत : तालुक्यातील बेळुंखी येथील माळी वस्तीवरील उसाच्या शेतात अचानक छापा टाकून जत पोलिसांनी एक किलो तयार गांजासह बारा किलोग्राम गांजा जप्त केला आहे. त्यामध्ये ५६ झाडांचा समावेश आहे. त्याची एकूण किंमत ५० हजार ६६० रुपये इतकी आहे. याप्रकरणी शेतजमीन मालक बबन पांडुरंग भोसले (वय ६३) व मारुती पांडुरंग भोसले (वय ५५, रा. दोघे बेळुंखी (ता. जत) या सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्यादरम्यान करण्यात आली आहे. याबाबत बबन आणि मारूती यांच्याविरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील वाशाण ते बेळुंखी दरम्यान बेळुंखीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर माळी वस्ती आहे. तेथे बबन व मारुती या सख्ख्या भावाची एकत्रित शेतजमीन आहे. रस्त्यापासून आत सुमारे पन्नास मीटर अंतरावर उसाच्या शेतात त्यांनी गांजाची झाडे लावली आहेत. याची माहिती खबऱ्यामार्फत जत विभाग पोलिस उपअधीक्षक नागनाथ वाकुर्डे याना मिळाल्यानंतर त्यांनी बुधवारी रात्री सहकाऱ्यांसमवेत छापा टाकला असता, तिथे ते चार फूट उंचीची गांजाची ५६ झाडे, एकूण अकरा किलोग्राम वजनाची मिळून आली आहेत. यावेळी त्यांच्या घराची झडती घेतली असता एक किलो ग्राम तयार गांजा पिशवित भरून ठेवलेला सापडला आहे. गांजाच्या झाडाची किंमत ४२ हजार ६४ रुपये व तयार गांजाची किंमत ७ हजार पाचशे वीस रुपये असा एकूण ५० हजार ६६० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत जत विभाग पोलिस उपअधीक्षक नागनाथ वाकुर्डे, पोलिस उपनिरीक्षक सुभाष कांबळे, मनोज सोनबलकर व पोलिस कर्मचारी तम्मा चोरमुले, आप्पा दराडे, विठ्ठल माळी, अमिर फकीर, विजय अकुल आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)