शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मिरवणुकांमधली ‘लेझर’मुळे ८० तरुणांच्या डोळ्यांना इजा, सांगली जिल्हा ऑप्थॉल्मॉजिस्ट संघटनेने केली बंदीची मागणी

By संतोष भिसे | Updated: August 14, 2024 16:44 IST

संतोष भिसे सांगली : विविध उत्सवांतील मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेसर किरणांमुळे डोळ्यांचे पडदे फाटण्याचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात महाराष्ट्रभरातील ...

संतोष भिसेसांगली : विविध उत्सवांतील मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेसर किरणांमुळे डोळ्यांचे पडदे फाटण्याचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात महाराष्ट्रभरातील नेत्रविकारतज्ज्ञांनी आवाज उठवायला सुरूवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सांगली जिल्हा ऑप्थॉल्मॉजिस्ट संघटनेने लेसरला विरोधाची भूमिका घेतली असून, कोल्हापुरातूनही शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.सांगलीच्या संघटनेने शनिवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांना निवेदन देऊन लेसरवर बंदीची मागणी केली. संघटनेने सांगितले की, लेसरच्या माऱ्यामुळे डोळ्यांच्या पडद्याला (नेत्रपटल) छिद्र पडलेले रुग्ण मोठ्या संख्येने उपचारांसाठी येत आहेत. गेल्यावर्षी गणेशोत्सव आणि दसऱ्या दरम्यानच्या विविध मिरवणुकांदरम्यान लेसरचा वापर मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यानंतरच्या महिन्याभरात जिल्हाभरातील नेत्रविकारतज्ज्ञांकडे डोळ्यांच्या उपचारांसाठी गर्दी होऊ लागली. लेसरमुळे ८० तरुणांच्या डोळ्यांच्या पडद्याला इजा झाल्याची नोंद संघटनेने केली आहे.

छिद्र पडते, भरून येत नाहीमिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या रंगीबेरंगी लेसरमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक असते. बुबुळांवर १० सेकंदांपेक्षा अधिक वेळ लेसरचा किरण स्थिर राहिल्यास डोळ्यांच्या पडद्याला इजा होते. प्रसंगी छिद्र पडते. त्यावर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. शस्त्रक्रियेनंतरही कमाल ७५ टक्क्यांपर्यंतच दृष्टी परत मिळते. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या मुलाच्या नेत्रपटलाला पडलेल्या छिद्रावर मिरजेत अजूनही उपचार सुरू आहेत.

नाशिक पोलिसांनी जाहीर केले निर्बंधनाशिकमध्ये नेत्रतज्ज्ञांनी लेसरच्या दुष्परिणामांचे गांभीर्य स्पष्ट केल्यानंतर तेथील पोलिसांनी यंदाच्या गणेशोत्सवातील मिरवणुकांत लेसरच्या वापरावर निर्बंध जाहीर केले आहेत. तोच निर्णय सांगली, कोल्हापूरसह राज्यभरात लागू व्हावा, यासाठी नेत्रतज्ज्ञांचा पाठपुरावा सुरू आहे.

लेसरमुळे नेत्रपटलांना इजा झालेले रुग्ण मोठ्या संख्येने आमच्याकडे उपचारांसाठी येत आहेत. यामध्ये २० ते ३० वर्षीय तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या विघातक लेसर किरणांचा मिरवणुकांत वापर बंद व्हावा, असे आमचे प्रयत्न आहेत. पोलिस अधीक्षकांनाही लवकरच निवेदन देणार आहोत. - डॉ. विद्यासागर चौगुले, अध्यक्ष, सांगली जिल्हा ऑप्थॉल्मॉजिस्ट असोसिएशन

टॅग्स :Sangliसांगली