शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

व्यायाम संस्था, सार्वजनिक मंडळांच्या चाैका-चाैकात पाऊलखुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:24 IST

सांगली : संस्थान किंवा शहर किंवा गाव म्हणून सांगलीचा जन्म १८०१ सालचा. मूळ मिरज संस्थानच्या २२ कर्यातीपैकी सांगली ही ...

सांगली : संस्थान किंवा शहर किंवा गाव म्हणून सांगलीचा जन्म १८०१ सालचा. मूळ मिरज संस्थानच्या २२ कर्यातीपैकी सांगली ही एक कर्यात. थाेरले चिंतामणराव पटवर्धन यांनी वसविलेल्या सहा गल्ल्यांच्या सांगलीचा गेल्या सव्वादाेनशे वर्षात ऐसपैस विस्तार झाला. या वाटचालीचे साक्षीदार बनलेल्या, गाव म्हणून सांगलीचा लाैकिक वाढविणाऱ्या विविध व्यायाम संस्था, सार्वजनिक मंडळांच्या नामरुपी बिरुदावल्या सांगलीतील चाैक अभिमानाने मिरवताहेत.

रणझुंजार चाैक, विश्वविजय चाैक, अजय चाैक, प्रशीक चाैक, विसावा चाैक, विश्वविजय चाैक, झाशी चाैक, विवेकानंद चाैक, आझाद चाैक ही काही उदाहरणे आहेत.

सांगलीच्या गावभागातील हांडे-पाटील तालमीचा एकेकाळी माेठा दबदबा. सार्वजनिक गणेशाेत्सव सुरू झाल्यानंतर दरवर्षी तालमीत गणपती बसवायचा शिरस्ता. दरम्यान, गावातील चाैका-चाैकात बसणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांमधील उत्साही वातावरण पाहून काेटगाेंड हांडे-पाटील यांच्यासह पहेलवानांंनी आपणही तालमीसमाेरील चाैकात मंडळ स्थापन करून गणपती बसवूया अशी चर्चा सुरू केली. यावर मंडळाचे नाव काय असावे. यावरून खल सुरू झाला. नाव सुचेना.. यावेळी तालमीच्या कट्ट्यावर बसलेले काेटगाेंड यांचे वडील म्हणाले ‘रणझुंजार’ नाव ठेवा. साऱ्यांनाच नाव पसंत पडले. चाैकात गणपती बसला. आणि चाैकालाही ‘रणझुंजार’ नाव पडले ते कायमचेच.

सांगलीच्या गावभागातील ४ नंबर शाळेजवळ अजय चाैक नावाची पाटी दिसते. येथील सामाजिक कार्यकर्ते अजय काेळी यांचे ऐन उमेदीत अपघाती निधन झाले. त्यांच्या मित्रांनी त्यांच्या स्मृती जागवत मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या नावावरून या चाैकाचे अजय चाैक असे नामकरण झाले.

सांगलीच्या बसस्थानकासमाेरील शास्त्री चाैक सर्वांच्या परिचयाचा. या चाैकात तत्कालीन नगरपरिषदेने उद्यान तयार करून त्यास लालबहादूर शास्त्री यांचे नाव दिले. दरम्यान, परिसरातील तरुण कार्यकर्त्यांनी चाैकात एक सार्वजनिक मंडळ स्थापन करण्याचे ठरविले. चाैकाचे आणि आपल्या मंडळाचेही शास्त्री चाैक मित्रमंडळ असे नामकरण केले. येथून पुढे हरिपूर रस्त्यावर प्रशिक चाैक दिसताे. ‘प्रज्ञाशील तरुण’ या संकल्पनेतून साकारलेल्या मंडळाचे संक्षिप्त नाव म्हणजे ‘प्रशीक चाैक’

सांगलीच्या खणभागातील आझाद व्यायाम मंडळाचा एकेकाळी माेठा लाैकीक हाेता. माजी नगराध्यक्ष रामभाऊ घाेडके यांच्या मार्गदर्शनाखालील या मंडळाच्या खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून राज्यभर लाैकिक मिळविला. या मंडळाच्या नावावरून स्टेशन राेडवरील आझाद चाैक ओळखला जाताे.

गावभागात विश्वविजय मित्र मंडळाच्या नावावरून विश्वविजय चाैक, विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विसावा मंडळाच्या नावावरून विसावा चाैक, विवेकानंद सार्वजनिक मंडळाच्या नावावरून विवेकानंद चाैक, त्रिमूर्ती सांस्कृतिक सामाजिक मंडळाच्या नावावरून त्रिमुर्ती चाैक, गणपती पेठेतील झाशी चाैक गणेशाेत्सव मंडळाच्या नावावरून झाशी चाैक, नरवीर तानाजी गणेशाेत्सव मंडळाच्या नावावरून तानाजी चाैक, गवळी गल्लीतील सरकारी तालमीजवळ गजेंद्र सामाजिक सांस्कृतिक मंडळाच्या नावावरून गजेंद्र चाैक ओळखला जाताे.

सांगलीच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात याेगदान देणाऱ्या संस्था, संघटनांचीही काही प्रातिनिधिक उदाहरणे. सांगलीतील चाैका-चाैकात ती अभिमानाने नामरुपाने जपली जात आहेत.