शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

निरोप, स्वागत आणि जल्लोषाला उधाण

By admin | Updated: December 31, 2015 23:58 IST

उत्साहाच्या चांदण्यात ‘थर्टी फर्स्ट’ साजरा : आशा, आकांक्षेच्या झुल्यावरून नववर्षाचे आगमन

सांगली : वाढत चाललेली बोचरी थंडी आणि जल्लोष टिपेला पोहोचवत गुरुवारी सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करताना शहरात उत्साहाला अक्षरश: उधाण आले होते. नियोजित मेजवानी आणि कार्यक्रमांमुळे आनंद व्दिगुणित होत होता, तर दुसरीकडे सरत्या वर्षाच्या अखेरीला नेमका मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने अनेकांच्या ‘थर्टी फर्स्ट’च्या नियोजनावर विरजण पडल्याचे दिसून आले. दरम्यान, नवीन वर्षाचे स्वागत करताना जल्लोष आणि हुल्लडबाजीला फाटा देत शहरातील काही तरुण मंडळांनी यावर्षीदेखील ‘दारू नको, दूध प्या’सारखे उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपली. शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी जय्यत तयारी केल्याचे दिसून आले. गरुवारी दुपारपासूनच अनेक ठिकाणी ‘थर्टी फर्स्ट’च्या तयारीचे नियोजन चालू होते. शाकाहारी आणि मांसाहारी मेजवानीचे बेत आखण्यात येत होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स व ढाबेही सज्ज झाले होते. आकर्षक विद्युत रोषणाई व ग्राहकांसाठी दिलेल्या खास आॅफर्समुळे शहरातील अनेक हॉटेल्स व शहराबाहेरील ढाबे रात्री गर्दीने फुलून गेले होते. यंदा पोलीस प्रशासनाने ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’बाबत कडक पावले उचलल्याने तळीरामांनी हुल्लडबाजी करण्याचे टाळल्याचे दिसून आले. दुपारपासूनच शहरात प्रमुख चौकात पोलिसांकडून वाहनधारकांची तपासणी सुरू होती. यंदा हॉटेल्स अथवा ढाब्यावर आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी अनेकांनी शहराबाहेरील निवांत ठिकाणी घरातून तयार केलेल्या पदार्थांवर ताव मारत ‘सेलिब्रेशन’ केले. नवीन वर्षाच्या स्वागताला तरुणाईसह सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले होते. (प्रतिनिधी) ‘डी’ युवा ग्रुपचा उपक्रम नववर्षाचे स्वागत करताना तरुण पिढीने व्यसनांपासून दूर रहावे यासाठी ‘डी’ युवा ग्रुपच्यावतीने शहरात ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रम राबविण्यात आला. शहरात मार्केट यार्ड, कॉलेज कॉर्नर, विश्रामबाग, लक्ष्मीनगर, चांदणी चौक, शामरावनगर, खणभाग, सूतगिरणी परिसर, संपत चौक, आहिल्यादेवी होळकर चौक व बुधगाव, माधवनगर भागात ग्रुपच्यावतीने दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी राहुल पवार, विनायक रुपनर, संतोष रुपनर, विश्वास माने, सागर गडदे, प्रकाश सरगर, पृथ्वीराज सावंत, दिलीप पडूळकर, अमोल वाघमारे, अभिजित हुलवी, अश्वीन मुळके आदी उपस्थित होते. अंनिसतर्फे नवीन वर्षाचे हटके स्वागतअंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने सरत्या वर्षाच्या शेवटी संविधान उत्थान व जात निर्मूलन जागृती प्रतिज्ञा घेत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. रात्री साडेदहाच्या दरम्यान सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागतात व्यस्त असताना समितीच्यावतीने मात्र, जात निर्मूलनाची प्रतिज्ञा देत एका विधायक उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. सामाजिक संस्थांचा संदेश : ‘दारु नको, दूध प्या’सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना, शहरातील काही तरुण मंडळे व सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत ‘दारू नको, दूध प्या’ सारखे उपक्रम यावर्षीही राबवत प्रबोधन साधले. सकाळपासूनच शहरातील महाविद्यालय परिसरात दुधाचे वाटप सुरु होते. सायंकाळी शहरातील प्रमुख चौकात दुधाचे वाटप सुरू होते. दूध वाटपाबरोबरच काही सामाजिक संस्थांनी व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत सजग करणाऱ्या पत्रकाचे वाटपही केले.शिवसेनेतर्फे विश्रामबाग येथे ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रम राबविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक भगवानराव शिंदे यांच्याहस्ते उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी हरिदास पडळकर, सुनील आलदर, अंकुश घुले, धनंजय शिंदे, संभाजी पुजारी, सचिन उपाध्ये, प्रसाद रिसवडे, धुंडाप्पा माळी, अशोक घोटाळे, सचिन गायकवाड, दादासाहेब पवार, विजय गडदे, डी. डी. डोंबाळे, पोपट वायदंडे, गणेश कोळी उपस्थित होते. शाकाहारी पार्ट्यांनी घेतली मांसाहारी पार्ट्यांची जागा नवीन वर्षाच्या स्वागताला उधाण आले असताना, अनेकांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने ३० तारखेलाच, तर काहीजणांनी नववर्षाच्या पहिल्यादिवशी सेलिब्रेशनची तयारी केल्याचे सांगितले. मात्र तरीही त्यांच्या उत्साहात कमी झाली नव्हती. त्यांनी घरात गोडधोड व शाकाहारी पदार्थांची मेजवानी करत नवीन वर्षाचे स्वागत केले. त्यामुळे श्रीखंड, बासुंदीसह पनीर आणि इतर शाकाहारी पदार्थांच्या खरेदीसाठी गर्दी होती.