दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे भाजपा युवा मोर्चा व नामदेवराव काळे ग्रंथालय यांच्या वतीने दिघंची हायस्कूल येथे सुरू करण्यात आलेले श्रीमंत बाबासाहेब देशमुख कोविड सेंटर अव्वल कोविड सेंटर असून, रुग्णांना चांगल्या सुविधा व उत्कृष्ट जेवण मिळत आहे.
कोविड सेंटरचे स्वयंसेवक कटुंबातील सदस्यासारखी रुग्णांची काळजी घेत आहेत. चहा, नाष्टा जेवण उत्कृष्ट व वेळेत मिळत असल्याचे रुग्णांकडून सांगितले जात आहे. आता ३० रुग्ण दाखल असून, ५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
कीर्तन, प्रवचन, मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. रोज एक अन्नदाता जेवण देत आहे. कोविड सेंटरमध्येच जेवण बनविले जात आहे. यासाठी प्रणव गुरव, केशव मिसाळ, प्रकाश शिंदे, चंद्रकांत पुसावळे, सोपान काळे, निनाद मोरे, पिंटू भाळवनकर, प्रमोद गुरव, ऋतुराज देशमुख, अमोल सावंत, प्रशांत चोथे रुग्णांची काळजी घेत आहेत.