शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

भावेंचा हरहुन्नरीपणा, जिद्द हाच यशाचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:59 IST

सांगली : आद्य नाटककार विष्णुदास भावे पदक स्वीकारल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. भावेंचा काळ आणि सध्याचा काळ यात मोठे अंतर आहे. आजच्या अभिनेत्यांनी विष्णुदास भावे यांच्यातील जिद्द, हरहुन्नरीपणा आत्मसात केला, तर त्यांना आयुष्यात यश मिळेल. हा पुरस्कार विनम्रपणे स्वीकारत आहे, असे भावोद््गार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी रविवारी काढले.दरवर्षी अखिल ...

सांगली : आद्य नाटककार विष्णुदास भावे पदक स्वीकारल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. भावेंचा काळ आणि सध्याचा काळ यात मोठे अंतर आहे. आजच्या अभिनेत्यांनी विष्णुदास भावे यांच्यातील जिद्द, हरहुन्नरीपणा आत्मसात केला, तर त्यांना आयुष्यात यश मिळेल. हा पुरस्कार विनम्रपणे स्वीकारत आहे, असे भावोद््गार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी रविवारी काढले.दरवर्षी अखिल महाराष्टÑ नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने रंगभूमी दिनानिमित्त मराठी नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारास ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ प्रदान करण्यात येते. यंदा हे पदक मराठी चित्रपट व नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाले होते. रविवारी सायंकाळी भावे नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्याहस्ते जोशी यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व गौरव पदक प्रदान करण्यात आले. यावेळी मोहन जोशी यांच्या पत्नी ज्योती जोशी, निर्मला सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कृतज्ञता व्यक्त करीत जोशी म्हणाले की, नाटक, सिनेमा, नातेवाईकांच्या भेटीसाठी अनेकदा सांगलीत आलो. गेले दोन दिवस मी सांगलीतच आहे; पण आज या व्यासपीठावर येताना छातीत धडधड सुरु होती. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. वीज संचारावी तसे मी भारावून गेलो आहे. भावे पुरस्काराच्या यादीत आता जयंत सावरकर यांच्यानंतर माझे नाव येणार आहे, त्याबद्दल मी साशंक होतो. पण निवड समितीने माझी एकमताने निवड केली. गेल्या काही वर्षात चांगले काम केले असावे, म्हणूनच माझी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विष्णुदास भावे हे जिद्दी, हरहुन्नरी होते. त्यांच्यातील काही गुण माझ्यातही आहेत. जिद्दीने काम केल्यास ते व्हायलाच हवे, अशी माझी धारणा आहे. भावेंनी हौशी रंगभूमीचा पाया रचला. त्यांच्याकडील जिद्द, हरहुन्नरीपणा आजच्या तरुण अभिनेत्यांनी अंगिकारला, तर त्यांना आयुष्यात मोठे यश मिळेल, असेही जोशी म्हणाले.कार्यक्रमाची सुरुवात नांदीने करण्यात आली. नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी विनायक केळकर, मेधा केळकर, व्ही. जे. ताम्हणकर, जगदीश कराळे, आनंदराव पाटील, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, बलदेव गवळी, बीना साखरपे आदी उपस्थित होते. शुभदा पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी आभार मानले.दरम्यान, सकाळी भावे नाट्यगृहात जयंत सावरकर व मोहन जोशी यांच्याहस्ते नटराजपूजन करण्यात आले. त्यानंतर सांगलीतील हौशी कलाकारांनी नाट्यसंगीत सादर केले.कलावंतांना पोरके करू नका : सावरकरअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष असलेले मोहन जोशी लवकरच परिषदेचे नेतृत्व सोडणार आहेत, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी कार्यक्रमात केला. मोहन जोशी यांच्या मनात सध्या काही वेगळेच चालले आहे; पण नाट्यपरिषदेच्या वादात कलावंतांना पोरके करू नका, असे भावनिक आवाहनही त्यांनी जोशी यांना केले.विष्णुदास भावे नावाशी जवळीकतामोहन जोशी यांनी पुरस्कार सोहळ्यात विष्णुदास भावे यांचा जीवनपट उलगडला. या नावाशी माझी जवळीकता आहे असे सांगत, विष्णू हे माझ्या वडिलांचे नाव आहे, तर भावे हे आईकडचे आडनाव असल्याचे सांगताच, रसिकांनी त्याला टाळ्यांनी दाद दिली.

टॅग्स :cultureसांस्कृतिक