शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाईट बोलण्याने हृदयावर ताण पडत असल्याने प्रत्येकाने गोड बोलत रहावे : रविकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:47 IST

खूप चांगली परंपरा आपल्याला लाभली आहे. संक्रांतीच्या माध्यमातून जो संदेश आपण एकमेकांना देतो, तो खूपच आरोग्यदायी आहे. वाईट बोलण्याने हृदयावर ताण पडत असल्याने प्रत्येकाने गोड बोलत रहावे, असे मत

ठळक मुद्देकटुतेमुळे घातक हार्मोन्स कार्यरत होतात

सांगली : खूप चांगली परंपरा आपल्याला लाभली आहे. संक्रांतीच्या माध्यमातून जो संदेश आपण एकमेकांना देतो, तो खूपच आरोग्यदायी आहे. वाईट बोलण्याने हृदयावर ताण पडत असल्याने प्रत्येकाने गोड बोलत रहावे, असे मत मिरजेतील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रविकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

ते म्हणाले की, कटू बोलण्याने कटुता वाढत जाते. एकमेकांशी विसंवाद झाला तर मने दुखावली जातात. दुखावलेल्या मनांमुळे पुन्हा नकारात्मक मानसिकता वाढीस लागते. वैद्यकीयदृष्टीने आपण याची समीक्षा केली तर वाईट बोलण्याचा परिणाम हा शरीरावर वाईटच होत असल्याचे सिद्ध झाले आहे. जेव्हा आपण एखाद्याला वाईट बोलतो, रागावतो, तेव्हा त्याचे परिणाम आपल्या मनावरही होत असतात. अशा वाईट गोष्टींमुळे शरीरातील वाईट हार्मोन्स कार्यरत होतात. चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे हार्मोन्स प्रत्येकाच्या शरीरात असतात. जेव्हा आपण चांगले बोलतो तेव्हा चांगले हार्मोन्स कार्यरत होऊन हृदयावरचा ताण कमी होतो आणि माणसाला आनंदी वाटत असते. अशी व्यक्ती हृदयरोगापासून स्वत:ला दूर ठेवू शकते.

एखादी व्यक्ती रागाच्या भरात दुसऱ्या व्यक्तीला काही कटू बोलते तेव्हा वाईट हार्मोन्सचा दुष्परिणाम सुरू होतो. हृदयाकडे जाणाºया वाहिन्यांवर ताण येतो आणि हृदयाच्या आजारांना आपण निमंत्रण देण्यास सुरुवात करतो. वास्तविक एका छोट्याशा चुकीच्या कृतीतून आपल्या शरीरावर इतके मोठे दुष्परिणाम होत असतात, याची कल्पना कदाचित अनेकांना नसते. त्यामुळे ते या गोष्टींचे भान ठेवत नाहीत.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात गोड बोलत राहण्याची सवय अंगीकारली पाहिजे. चांगले शरीर, चांगले हृदय, चांगले आरोग्य आपल्याला हवे असेल तर गोड बोलावेच लागेल. कितीही कटू प्रसंग आले तरी रागावर नियंत्रण ठेवायला हवे. हे नियंत्रण तुमच्या फायद्याचेच ठरणार आहे. याउलट कसल्याही प्रकारचा राग हा शरीरासाठी घातकच ठरू शकतो.सकारात्मक समाज आणि आरोग्यदायी समाजाची निर्मिती करताना आपण सर्वांनी त्याला गोड बोलून, सुसंवाद साधून हातभार लावायला हवा. यामाध्यमातून आपण समाजाचीही सेवा करू शकतो.‘लोकमत’ने सुरू केलेले हे अभियान अत्यंत चांगले आहे. पुरातन काळापासून जो गोड बोलण्याचा संदेश दिला जात आहे, तो आरोग्यदृष्ट्या प्रत्येकाला व समाजालाही तितकाच लाभदायी आहे. याचा स्वीकार केवळ एका दिवसापुरता नव्हे, तर आयुष्यभर करायला हवा, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगली