शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शंभर कोटीतील कामांच्या फायली मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 15:40 IST

शासनाच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शंभर कोटींमधील विकास कामांच्या दरमान्यतेचे प्रस्ताव अखेर प्रशासनाने स्थायी समितीला सादर केले. येत्या शनिवारी होणाऱ्या स्थायी सभेत ४० कामांना मान्यता दिली जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने आणखी कामांचे प्रस्ताव स्थायीकडे पाठविले जातील, असे प्रशासनातून सांगण्यात आले. त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर शंभर कोटींच्या निधीतील कामांना गती येणार आहे.

ठळक मुद्देअखेर शंभर कोटीतील कामांच्या फायली मार्गीपावसाळ्यात वृक्ष लागवड करण्यासाठी निविदा

सांगली : शासनाच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शंभर कोटींमधील विकास कामांच्या दरमान्यतेचे प्रस्ताव अखेर प्रशासनाने स्थायी समितीला सादर केले. येत्या शनिवारी होणाऱ्या स्थायी सभेत ४० कामांना मान्यता दिली जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने आणखी कामांचे प्रस्ताव स्थायीकडे पाठविले जातील, असे प्रशासनातून सांगण्यात आले. त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर शंभर कोटींच्या निधीतील कामांना गती येणार आहे.महापालिका प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शंभर कोटीच्या निधीतून २६० विकास कामांच्या निविदा मागविल्या होत्या. त्यापैकी २०६ कामांना प्रतिसाद मिळाला होता. उर्वरित ५४ कामांच्या फेरनिविदा काढल्या होत्या. २५ लाखांवरील कामे स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठविणे आवश्यक होते.

आयुक्तांनी पहिल्या टप्प्यात ४० कामांच्या निविदांच्या दरमान्यतेचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला. या कामांची दरमान्यता येत्या शनिवारी होणाऱ्या सभेत दिली जाणार आहे. उर्वरित कामांचे प्रस्ताव टप्प्या- टप्प्याने स्थायी समितीकडे पाठविण्यात येणार आहेत.सभेच्या अजेंड्यावर ३० लाख ७५ हजार रुपये खर्चाच्या दोन नवीन शववाहिका खरेदीला मान्यता देण्याचा, तसेच चार वाहन चालकांची मानधनावर नेमणूक करण्याचा विषयही स्थायी समितीच्या सभेत आला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात ७७ मेट्रिक टन ब्लिचिंग पावडर, १६० टन पीएसी पावडर, ८० टन लिक्विड क्लोरिन गॅस खरेदी करण्यासाठी स्वतंत्र ७६ लाखांच्या निविदा मागविण्याचा विषय चर्चेला आला आहे.

पाणीपुरवठा विभागाकडे दैनंदिन देखभाल, दुरूस्तीचे कामकाज करण्यासाठी सांगली व कुपवाड विभागासाठी २४, तर मिरजेसाठी १५ अशा एकूण ४० कामगारांचा पुरवठा करण्यास एजन्सी नेमण्याची निविदा प्रसिध्द करण्यासाठी मान्यता देण्याचा विषय आहे.

महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्यासाठी शासकीय दराने ६० हजार देशी प्रजातीची रोपे प्रति ७५ रुपयेप्रमाणे खरेदी करण्याची निविदा प्रसिध्द करण्यात येणार आहे. या विषयाला मान्यता देण्याचा विषय शनिवारच्या सभेत आला आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली