शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात ४० आयटी कंपन्या, देश-विदेशात सॉफ्टवेअरची निर्यात

By संतोष भिसे | Updated: December 30, 2024 12:46 IST

टीसीएस, इन्फोसिस सुविधाअंभावी थबकल्या

संतोष भिसेसांगली : सांगलीत आयटी पार्कचा विचार सुरू होण्यापूर्वीच अनेक व्यावसायिकांनी स्वत:पुरते स्वतंत्र व्यवसाय सुरू केले होते. आजमितीला सांगली, मिरजेत ४० हून अधिक आयटी व्यवसाय पाय रोवून आहेत. देशांतर्गत कंपन्यांसोबतच विदेशातही सॉफ्टवेअरची निर्यात करत आहेत.केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार कोल्हापुरातून झालेली निर्यातही लक्षवेधी आहे. तेथील सॉफ्टवेअर व्यावसायिकांनी २०१९-२० मध्ये १२८ कोटी रुपयांची निर्यात केली होती. ती २०२३-२४ मध्ये ५० टक्क्यांनी वाढून १८९ कोटी रुपयांवर पोहोचली.सध्या कोल्हापूर व परिसरात ३५० आयटी कंपन्या कार्यरत आहेत, त्या तुलनेत सांगलीत या व्यवसायाचा विस्तार खूपच छोटा आहे. तो वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. सांगली जिल्ह्यातील ४० हून अधिक आयटी कंपन्यांनी सांगली-मिरज आयटी असोसिएशनच्या स्थापना केली आहे. पण, संघटना म्हणून या क्षेत्राच्या विकासासाठी फारच कमी काम होते. प्रत्येक व्यावसायिक स्वबळावर व्यवसायाचा विस्तार करत आहे. सॉफ्टवेअर निर्यात करत आहे.

सांगलीचे टॅलेंट कॅनडा, ऑस्ट्रियालासांगलीतील आयटी कंपन्यांमधून कॅनडा, ऑस्ट्रिया, नेदरलॅंड, आफ्रिका, फ्रान्स आदी देशांत साॅफ्टवेअरची निर्यात केली जाते. स्वत:ची बुद्धिमत्ता आणि क्षमता दाखवत या कंपन्यांनी तेथील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. या साखळीतून आणखी काही कंपन्या सांगलीतून सॉफ्टवेअर घेण्यास उत्सुक आहेत.

टीसीएस, इन्फोसिस सुविधाअंभावी थबकल्यासांगलीतून आयटी सेक्टरचे शिक्षण घेऊन नोकरीसाठी पुण्या-मुंबईची वाट धरणाऱ्या तरुणांना सांगलीतच थांबवायला हवे. हे ब्रेन ड्रेन रोखायला हवे. त्यासाठी एखादी मदर इंडस्ट्री स्वरूपाची आयटी कंपनी येथे येणे आवश्यक आहे. यासंदर्भात सांगली-मिरज आयटी असोसिएशनने इन्फोसिस, टीसीएस अशा काही दिग्गज कंपन्यांशी संपर्क केला होता. पण सांगलीत पायाभूत सुविधा नसल्याने त्या थबकल्या.

वर्षाला दीड हजारांवर पदवीधरसांगली जिल्ह्यात १७ हून अधिक महाविद्यालयांत आयटीविषयक अभ्यासक्रम शिकविले जातात. त्यातून वर्षाला दीड हजारांवर पदवीधर बाहेर पडतात. यापैकी बहुतांशी तरुण मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरु, चेन्नई आदी शहरांची वाट धरतात. त्यामुळे जिल्ह्यात बुद्धिमान विद्यार्थ्यांची कमी नाही हे स्पष्ट होते. हे तरुण सांगलीतच थांबल्यास जिल्ह्याचा जीडीपी वाढण्यास हातभार लावतील हे निश्चित.

टॅग्स :SangliसांगलीITमाहिती तंत्रज्ञान