शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मैदान जाहीर होण्यापूर्वीच शिराळ्यात दोघांचा शड्डू : विधानसभेला कुस्त्यांचा फड रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:16 IST

अशोक पाटील ।इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीचा फड रंगण्याअगोदरच राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन भाऊंनी शड्डू ठोकले आहेत. भाजपची लांग बांधून आमदार शिवाजीराव नाईक यांनी तयारी केली आहे. पेठनाक्यावरील वस्ताद नाना महाडिक यांनी आमदार नाईक यांचा खुराक बंद करून स्वत:चा पठ्ठा सम्राट महाडिक याला ...

ठळक मुद्देपेठनाक्यावरील पठ्ठ्याचाही कसून सराव

अशोक पाटील ।इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीचा फड रंगण्याअगोदरच राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन भाऊंनी शड्डू ठोकले आहेत. भाजपची लांग बांधून आमदार शिवाजीराव नाईक यांनी तयारी केली आहे. पेठनाक्यावरील वस्ताद नाना महाडिक यांनी आमदार नाईक यांचा खुराक बंद करून स्वत:चा पठ्ठा सम्राट महाडिक याला थंडाईचा रतीब लावला आहे. सम्राट यांनीही कसून सराव सुरू केला असून यंदाचे मैदान कोण मारणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी गोरक्षनाथ यात्रेनिमित्त शिराळ्यात लाल मातीतील कुस्त्यांचे मैदान भरवून आमदार शिवाजीराव नाईक यांना आव्हान देत शक्तिप्रदर्शन केले. स्थानिक पातळीवर दोन भाऊंची समझोता एक्स्प्रेस हातात हात देऊन सुसाट असतानाच, सत्यजित देशमुख यांनीही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. सागाव येथील ५0 वर्षांपासून बंद असलेले कुस्त्यांचे मैदान पुन्हा सुरू करुन देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांना, ‘यावेळी तुम्ही थांबा आणि मला मदत करा’, असा अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. त्यामुळे या दोघांचे वस्ताद आमदार जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

शिराळा येथील कुस्ती मैदान दोन्ही काँग्रेसच्यावतीने एकत्रित होणार होते. परंतु काँग्रेसच्या काहींनी याला आक्षेप घेतला. हे राजकारण पेटले असताना भाजपचे रणधीर नाईक यांनी धार्मिक यात्रेत कुस्ती मैदानाचे राजकारण करु नका, असा पवित्रा घेतला. त्यामुळे तिन्ही गटात राजकारण रंगले होते. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत तिन्ही गट विधानसभेची रंगीत तालीम करत आहेत.

महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांनी जोर, बैठका काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यापाठोपाठ नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले चिकुर्डेचे अभिजित पाटील यांनीही शिवसेनेच्या तिकिटावर मैदानात उतरण्याची चाचपणी सुरु केली आहे. त्यामुळे शिराळा येथील विधानसभा कुस्तीचा फंड चांगलाच रंगणार हे आतापासूनच स्पष्ट होत आहे.त्या ४९ गावांनाही निवडणुकीचे वेधशिराळा मतदार संघात वाळवा तालुक्यातील ४९ गावांतील नेत्यांचा कधीच विचार घेतला जात नाही. विधानसभेची सुगी अली की मग आमदार शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांना या गावांची व तेथील पदाधिकाऱ्यांची आठवण येते आणि हे सर्वच नेते तेथील सुख-दु:खाच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यामुळे ४९ गावांतील पदाधिकाºयांनाही शिराळा विधानसभेचे वेध लागले आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली