कोरोना साथीमुळे जिल्ह्यात सभा, मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरूस व मशिदीत एकत्र येऊन नमाज पठणास, विनाकारण एकत्र जमण्यास मनाई आदेश लागू आहे. मीरासाहेब दर्गा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी बंदी आदेशाची माहिती दिली होती. मात्र बुधवारी रात्री मोहरम सणानिमित्त मीरासाहेब दर्ग्यासमोर मोहरम खान्यात पंजे बसवण्याचा कार्यक्रम सुरू असताना सुमारे ४०० ते ४५० जनसमुदाय जमला होता. पोलिसांनी खादीम जमातीच्या जबाबदार व्यक्तींना गर्दी हटवण्यास सांगितल्यानंतर त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
यामुळे दर्गा पंच नजीर अहमद मुश्रीफ, अब्दुल मुजीब मुतवल्ली यांच्यासह दर्गा खादीम जमातीचे असगर शरीकमसलत, हुसेन मुतवल्ली, जुबेर शरीकमसलत, इसरार मुश्रीफ, जानीब मुश्रीफ, शाहीद मुतवल्ली, बद्रुदीन शरीकमसलत निजाम मुश्रीफ, महमदअली मुश्रीफ, अव्दुलगफार मुश्रीफ, वसीम मुश्रीफ, रफिक मुश्रीफ, शमशुद्दीन मुश्रीफ, नियाज अहमद शरीकमसलत, नदीम मुश्रीफ, शहाबाज मुश्रीफ, सुहेल मुश्रीफ, रियाज शरीकमसलत, अहमद शरीकमसलत, तोहीद शरीकमसलत, ताैफीक शरीकमसलत, अल्लाबक्ष शरीकमसलत, निहाल मुश्रीफ, इम्रान मुश्रीफ, इरफान शमशोदीन मुश्रीफ, शारुख शरीकमसलत, शाबाज शरीकमसलत (सर्व रा. मिरज) या ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून दर्ग्यासमोर मैदानात बेकायदा जमाव जमवून पंजा स्थापनेचा कार्यक्रम केल्याचा गुन्हा आहे. या प्रकरणी सहाय्यक फाैजदार संजय पाटील यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.