शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

कुपवाड एमआयडीसीत ईएसआयचे ५० खाटांचे रुग्णालय मंजूर, कृष्णा व्हॅली चेंबरच्या पाठपुराव्याला अखेर यश

By श्रीनिवास नागे | Updated: March 2, 2023 17:46 IST

राज्य कामगार विमा योजनेने विमाधारकांची पाच वर्षांतील वाढ विचारात घेऊन औद्योगिक वसाहतीमध्ये १००० चौरस मीटरच्या जागेवर ५० खाटांचे रुग्णालय उभारणी करण्यासाठी परवानगी दिली आहे

कुपवाड (सांगली) : कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये राज्य कामगार विमा योजनेचे (ईएसआय) रुग्णालय उभारणीसाठी राज्य कामगार विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक करंजकर यांनी नुकतीच मान्यता दिली. यामुळे ५० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सलग तीन वर्षाच्या पाठपुराव्यास यश मिळाल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, संचालक रमेश आरवाडे यांनी दिली.मालू म्हणाले की, कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये कृष्णा व्हॅली चेंबरच्या वतीने राज्य कामगार विमा योजनेचे रुग्णालय उभारण्यासाठी भूखंड मिळण्याकरिता शासकीय पातळीवर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, राज्य कामगार विमा योजना यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधीशीही संपर्क साधला होता. आमदार सुधीर गाडगीळ यांनी लक्ष घालून मुंबई कार्यालयाशी संपर्क साधला. परिणामी मुंबई कार्यालयाने याची दखल घेतली. कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने या सर्व पत्रव्यवहाराचा पाठपुरावा संचालक रमेश आरवाडे यांनी केला. राज्य कामगार विमा योजनेने विमाधारकांची पाच वर्षांतील वाढ विचारात घेऊन औद्योगिक वसाहतीमध्ये १००० चौरस मीटरच्या जागेवर ५० खाटांचे रुग्णालय उभारणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव यांचे सहकार्य मिळाले. लवकरच कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर भूखंड दिला जाईल व गतीने रुग्णालय उभारणी केली जाईल.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडू एरंडोले, संचालक हरिभाऊ गुरव, दीपक मर्दा, रतिलाल पटेल, बाळासाहेब पाटील, अरुण भगत, हेमलता शिंदे, नितीश शहा, रागिणी पाटील, पांडुरंग रुपनर, राजगोंडा पाटील, दिनेश पटेल, व्यवस्थापक अमोल पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल