लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सेवायोजन कार्यालयाच्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक क्षेत्र व खासगी उद्योजकांनी मनुष्यबळाची माहिती सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व उद्योजकांनी तिमाहीचे विवरणपत्र ऑनलाईन सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जे. बी. करीम यांनी केले आहे.
----
सेवायोजन कार्ड अद्ययावत करा अन्यथा रद्द
सांगली : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या पोर्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपले कार्ड अद्ययावत करावे. आधारकार्ड नंबर, ई-मेल, मोबाईल नंबर लिंक न केलेल्या उमेदवारांनी नोंदणीमध्ये आधारकार्ड नंबर, ई-मेल, मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांनी नोंदणी आधारकार्डशी लिंक केलेली नाही, त्यांचे सेवायोजन कार्ड रद्द होणार असल्याने सर्वांनी ते अद्ययावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जे. बी. करीम यांनी केले आहे.