लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीतील कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष शिवाजी जोती पाटील (वय ५९ रा. सांगली, मूळ रा. शिरढोण) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांनी कृष्णा व्हॅली चेंबरची मागील ११ वर्षांपासून जबाबदारी पार पाडली होती. तसेच त्यांनी या कालावधीत ६ वर्षे अध्यक्षपदही सांभाळले होते. केंद्रीय उत्पादन शुल्क, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तसेच इतर विविध विभागात सल्लागार म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीतील वीज, रस्ते, फायर स्टेशन, उद्योजकांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी एमएसएमई प्रदर्शन, माथाडी कामगारांच्या समस्यांचे निवारण अशी अनेक मोठी कामे झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. त्याच्या निधनाने औद्योगिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.