शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दूच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचा पेपर, परीक्षा परिषदेचा सावळा गोंधळ

By अशोक डोंबाळे | Updated: August 5, 2022 16:31 IST

उर्दू माध्यमांच्या मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार

अशोक डोंबाळेसांगली : राज्यात दि. ३१ जुलै २०२२ रोजी झालेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत आठवीच्या उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचा पेपर दिला आहे. यामुळे उर्दू माध्यमांच्या मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. म्हणून शिक्षण आयुक्तांनी आठवीच्या उर्दू माध्यमांच्या मुलांची फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी शिक्षक संघटना आणि पालकांनी केली आहे.रविवार, दि. ३१ जुलै रोजी राज्यात शिष्यवृत्तीपरीक्षा झाली आहे. आठवीच्या उर्दू माध्यमाच्या मुलांना बुद्धिमत्ता व इंग्रजी विषयाचा दुसरा पेपर दिला होता. यामध्ये फार मोठी चूक झाली आहे. उर्दू व मराठी माध्यमाच्या मुलांना तृतीय भाषा इंग्रजी हा विषय असतो, मराठी माध्यमाच्या मुलांचा इंग्रजी विषयाचा पेपर बरोबर होता; मात्र उर्दू माध्यमाच्या मुलांना बुद्धिमत्ता व इंग्रजी पेपरमध्ये इंग्रजी विषयाचे जे प्रश्न विचारले आहेत ते इंग्रजी माध्यमाच्या प्रथम भाषेचे आहेत. वास्तविक पाहता मराठी माध्यमाचा पेपर आहे, तोच पेपर उर्दू माध्यमाच्या मुलांना देण अपेक्षित होते.तृतीय भाषा इंग्रजीचा पेपर देण्याऐवजी प्रथम भाषा इंग्रजी माध्यमाचा पेपर दिला आहे. यामुळे मुलांना इंग्रजीचा पेपरच सोडविता आला नाही. या प्रकारामुळे मुले संपूर्णपणे गोंधळलेली दिसून आली. चुकीचा पेपर दिल्यामुळे उर्दू माध्यमाची मुले पेपर सोडवूच शकली नाहीत. राज्यात सर्वत्र असाच प्रकार झाला असून, याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. तसेच उर्दू माध्यमाच्या आठवीच्या मुलांचा दोन नंबरचा पेपर पुन्हा घेण्याची गरज आहे. नाही तर जे इंग्रजी विषयाचे गुण आहेत ते संपूर्ण गुण मुलांना देण्याची गरज आहे. अन्यथा उर्दू माध्यमांच्या पालकांना मुलांच्या हितासाठी राज्यभर आंदोलन करावे लागेल, असा इशारा पालकांनी दिला आहे.मुलांना शंभर टक्के गुण द्या : मुश्ताक पटेलशिष्यवृत्ती परीक्षेत उर्दू माध्यम आठवीच्या दोन नंबरचा पेपर इंग्रजी माध्यमाच्या मुलांचा दिला आहे. ही गंभीर चूक शिक्षण विभागाकडून राज्यात सर्वत्र झाली आहे. एक तर शिक्षण विभागाने फेरपरीक्षा घ्यावी, नाही तर मुलांना इंग्रजी पेपरला १०० टक्के गुण द्यावेत, अशी मागणी शिक्षक भारत उर्दू संघटनेचे राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीScholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा