शहरं
Join us  
Trending Stories
1
साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?
2
मोठी बातमी! टेकऑफनंतर चीनजवळ गायब झाले रशियन विमान, ५० प्रवाशांचे काय झाले? जाणून घ्या...
3
११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन
4
भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी
5
कोणाला हवा सोनम-राजचा जामीन?, राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट; ४० लाखाबाबत खुलासा
6
निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?
7
'बिग बीं'पासून ते SRK पर्यंत अनेकांची गुंतवणूक, आता कंपनीचा येणार IPO; पाहा काय आहेत डिटेल्स?
8
१ कोटी कॅश, ७९ ATM कार्ड, ३० मोबाईल...; ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, १६ जणांना अटक
9
अनिल अंबानी ग्रुपवर ED ची कारवाई, ३००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ५० ठिकाणी छापे
10
चॉकलेट, कार, व्हिस्की...; FTA करारानंतर स्वस्त होणार 'या' वस्तू; पण इंग्लंडला काय फायदा होणार?
11
कुणाल खेमूच्या 'कलयुग'मधली रेणुका आठवतेय का? इंडस्ट्रीला केला रामराम अन् बनली पोल डान्सर
12
Janhvi Kapoor : कल्याणमधील तरुणीला मारहाणीचा व्हिडिओ बघून संतापली जान्हवी कपूर, म्हणाली....
13
Jivati Puja 2025 : जिवतीचा कागद अमावस्येला लावावा की श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी? वाचा व्रतविधी आणि माहिती!
14
दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
15
हृदयद्रावक! वडिलांना चहा देऊन गेली अन्...; मासिक पाळीचा त्रास असह्य, मुलीने संपवलं आयुष्य
16
ऑनलाईन रमीच्या नादात शिक्षिका चोर बनली,बुरखा घालून ८ लाखांवर डल्ला मारला; चेहऱ्यावरील तीळामुळे सापडली
17
दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच...
18
आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाहीत; RBI नं रद्द केला या बँकेचा लायसन्स, पुढे काय होणार?
19
‘ती’ मुलगी घरातच ठरली असुरक्षित; वडील, भावांसह चौघांचा ११ महिने लैंगिक अत्याचार
20
गुरुपुष्यामृतयोगात श्रावणारंभ: श्रावणी सोमवारी शिवामूठ कशी वाहावी? योग्य पद्धत, दानमहात्म्य

तिसऱ्या लाटेत मुलांना धोका; पण उपचारांसाठी बालरोगतज्ज्ञांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. या संकटाला तोंड देण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. या संकटाला तोंड देण्यासाठी शासकीय स्तरावर पुरेसे बालरोगतज्ज्ञ मात्र उपलब्ध नाहीत. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अवघे १८ बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांना सोबत घेतल्याशिवाय तिसऱ्या लाटेला तोंड देणे शक्य नसल्याचे स्पष्ट आहे.

लहान मुलांना कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हास्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.

लहान मुलांमधील कोरोना संसर्गाला आळा घालणे, गंभीर व अतिगंभीर बालकांच्या उपचारांचे व्यवस्थापन करणे, औषधोपचारांची दिशा निश्चित करणे आदी कामे या फोर्सवर सोपवली आहेत. या युद्धसज्जतेमध्ये प्रत्यक्ष लढणाऱ्यांचीच कमतरता आहे. सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयांत अवघे ८ बालरोगतज्ज्ञ आहेत. जिल्हाभरातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांत ९ तज्ज्ञ आहेत. दोन ग्रामीण रुग्णालयांत मानद सेवा देणारे बालरोगतज्ज्ञ आहेत. ६१ प्राथमिक आरोग्य केंद्रांत एकही बालरोगतज्ज्ञ नाही. त्याशिवाय स्वतंत्र पॅरामेडिकल स्टाफही नाही. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाला हाताशी धरून कोरोनाच्या वादळाला तोंड कसे द्यायचे, हा मोठा प्रश्न आहे.

जुलै, ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता असून यामध्ये लहान मुले मोठ्या प्रमाणावर बाधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी मिरज कोविड रुग्णालय, वॉन्लेस रुग्णालय, भारती रुग्णालय येथे बेड राखीव ठेवण्याचे नियोजन आहे. बालकांसाठी मास्क, ऑक्सिजन उपकरणे, खाटा यांचीही तयारी सुरू आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेला शासकीय रुग्णालयांनी समर्थपणे तोंड दिले, शिवाय खासगी रुग्णालयांनीही स्वतंत्र उपचार सुरू केले. त्याच पद्धतीने तिसऱ्या लाटेतही लहान मुलांसाठी सर्व खासगी बालरोगतज्ज्ञ मदतीला येतील, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने डॉक्टरांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

चौकट

ग्रामीण भागात एकही बालरोगतज्ज्ञ

सांगली, मिरजेसोबत सर्व तालुक्यांच्या शहरांत बालरोग तज्ज्ञ आहेत; पण ग्रामीण भागात वानवा आहे. ६१ प्राथमिक आरोग्य केंद्रांत एकही बालरोगतज्ज्ञ नाही. माडग्याळसारख्या ग्रामीण रुग्णालयात मुलांसाठी गरजेनुसार खासगी डॉक्टर बोलावून घेतला जातो. खासगी डॉक्टर तर अजिबातच नाहीत. या स्थितीत कोरोनाबाधित मुलांना घेऊन सर्व पालक शहरांकडे धाव घेणार आहेत. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाला सज्जता करावी लागेल.

चौकट

कोरोनाबाधित मुलांसाठी यंत्रणेची तयारी सुरू

लहान मुलांवरील उपचारांसाठी लागणाऱ्या सामग्रीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली आहे. आनुषंगिक औषधे, साहित्य सामग्री यांची खरेदी वेळेत करण्याची सूचना दिली आहे. जिल्ह्यातील सर्व बालरोगतज्ज्ञांची, रुग्णालयांची व तेथील सुविधांची माहिती घेण्यास सांगितले आहे. तीव्रता वाढल्यास ही रुग्णालये आरक्षित करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

तिसऱ्या लाटेत मुले बाधित होणार हे गृहीत धरूनच प्रशासन तयारी करत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बालरोगतज्ज्ञांचा, शासकीय आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यशाळेचे नियोजन करण्यात येत आहे.

चौकट

अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांचीही मदत

मुलांमधील कोरोनाचे लवकर निदान, घरगुती विलगीकरण याबाबत अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांनाही मदतीला घेतले जाणार आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ग्राफ

एकूण कोरोनाबाधित १,१३,२०८

बरे झालेले रुग्ण ९७,०६६

उपचाराखालील रुग्ण १२,८७६

१० वर्षांपेक्षी कमी वयाचे रुग्ण ३२७३

११ ते २० वर्षे वयोगटातील रुग्ण ७४३६

पॉइंटर्स

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे ६१

बालरोगतज्ज्ञ ००

उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये १५

बालरोगतज्ज्ञ ११

जिल्हा रुग्णालय १

बालरोगतज्ज्ञ ४

कोट

तिसऱ्या लाटेत मुलांना धोका असल्याचे लक्षात घेऊन जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन केला आहे. बाधित होणाऱ्या मुलांवर उपचार आणि आवश्यक उपाययोजनांसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांची यादी तयार करण्याचे तसेच त्यांची कार्यशाळा घेण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी.