शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या हळदीला अखेर जीआय मानांकन-मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडून मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 20:36 IST

सांगलीच्या हळदीला स्वत:ची ओळख प्राप्त करून देणारे जीआय मानांकन मिळाल्यामुळे आता ‘सांगलीची हळद’ या नावाखाली अन्य कोणत्याही हळदीची विक्री होऊ शकणार नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या लढ्याला यश

सांगली : सांगलीच्या हळदीला स्वत:ची ओळख प्राप्त करून देणारे जीआय मानांकन मिळाल्यामुळे आता ‘सांगलीची हळद’ या नावाखाली अन्य कोणत्याही हळदीची विक्री होऊ शकणार नाही. गेल्या पाच वर्षांच्या प्रयत्नानंतर जीआय मानांकनाला अखेर हिरवा कंदील मिळाला असून, बुधवारी मुंबई येथे झालेल्या सुनावणीमध्ये ही मान्यता देण्यात आली.

सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन (जिआॅग्राफिकल इंडेक्स : जीआय) मिळावे, अशी मागणी येथील शेतकºयांनी प्रथम २०१३ मध्ये मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडे केली होती. त्याचवेळी वर्धा जिल्'ातील वायगाव येथील शेतकºयांनी वायगावी हळदीला जीआय मानांकन मिळविण्यासाठीही प्रस्ताव सादर केला होता. वायगाव हे गाव ८० टक्के हळदीचे उत्पादन घेत आहे. त्या हळदीत करक्युमिनचे प्रमाण ६ ते ८ टक्के आहे. याच हळदीने इतर वाणांच्या हळदीला मागे टाकून जीआय मानांकन मिळविले होते. त्यामुळे सांगलीच्या हळदीचे जीआय मानांकन हुकले होते.नंतर सांगलीच्या हळदीचा फेरप्रस्ताव सादर झाला. भारतातील ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो.

देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो. केशरी रंग, पेवातील साठवणूक ही येथील हळदीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे, सांगलीची हळद म्हणूनच भौगोलिक मानांकन (जिआॅग्राफिकल इंडेक्स : जीआय) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडे पुन्हा केली होती. त्यावर बुधवारी (दि. २६ जून) सुनावणी झाली.

शेतकºयांतर्फे ‘जीआय’ विषयातील अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांनी भौगोलिक उपदर्शन नोंदणी विभागाचे सहायक रजिस्ट्रार चिन्नाराजा जी. नायडू यांच्यासमोर सांगलीच्या हळदीच्या वैशिष्ट्यांची मांडणी केली. या सर्वांची बाजू समजून घेतल्यानंतर नायडू यांनी सांगलीच्या हळदीला जीआय मानांकन जाहीर केले.

प्रा. हिंगमिरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, सांगली ही देशातीलच नव्हे, तर जगातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे. या परिसरात पिकणारी दर्जेदार राजापुरी हळद, दर्जा वर्षानुवर्षे टिकवून ठेवणारी जमिनीखालची पेवांची व्यवस्था, पेवांतील हळदीची आकडेआकडी (बिल टू बिल) खरेदी-विक्री, सांगलीचा वायदेबाजार आदी घटकांमुळे सांगली देशभरातील हळद केंद्र बनण्यास महत्त्वपूर्ण ठरले आहे. या सर्व गोष्टींची मांडणी भौगोलिक उपदर्शन नोंदणी विभागासमोर केली. त्याची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर सांगलीच्या हळदीला जीआय मानांकन जाहीर झाले आहे.हळदीला मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्टय बाजारपेठेत ‘सांगलीची हळद’ म्हणून मान्यता मिळाली आहे. ही मान्यता केंद्र सरकारकडून मिळाल्यामुळे हा सांगलीचा ब्रॅँड म्हणून कायमस्वरूपी बाजारात विकला जाणार आहे. आजवर जगातील १६० देशांनी जीआय मानांकनास मान्यता दिली आहे. ते मानांकन असलेल्या शेतमालाविषयी शंका घेतली जात नाही. शिवाय हे मानांकन मिळाल्यानंतर त्या त्या परिसरातील पिकांच्या गुणवैशिष्ट्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते. 

जीआय मानांकनामुळे होणारे फायदे...- सांगली हळदीला जीआय मानांकनाचा कोड मिळणार- जगातील आजवर १६० देशांची जीआय मानांकनास मान्यता- आंतरराष्टÑीय बाजारपेठेत सांगलीची हळद म्हणून मान्यता- शेतीमालास प्रतिष्ठा व नेमकी ओळख- शासनाकडून मानांकन मिळाल्यामुळे गुणवत्तेची खात्री- मानांकन असलेल्या मालाविषयी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शंका घेतली जात नाही

 

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजार