शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

आपत्ती निमंत्रण: राजकीय नेत्यांकडूनच सांगलीतील नाल्यांचा बाजार, सर्वच मुख्यमंत्र्यांच्या घोषणा हवेत 

By अविनाश कोळी | Updated: August 14, 2023 17:37 IST

नाल्यांच्या बफर झोनमध्ये, ओतात, पूरपट्ट्यात महापालिकेच्या परवानगीशिवाय जी बांधकामे उभी राहताहेत त्यांना राजकीय लोकांचा आश्रय

अविनाश कोळीसांगली : महापुराची पाहणी करायला आल्यानंतर गेल्या १८ वर्षांत प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी पूरपट्टा, नाले, ओत यांच्यावरील अतिक्रमणे हटवून पुनर्वसनाच्या घोषणा केल्या. या सर्व घोषणा हवेत विरल्या. सर्वच पक्षांचे राजकीय नेते, कार्यकर्ते किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांची बांधकामे या पूरपट्ट्यात असल्यामुळे साऱ्यांनीच या प्रश्नावर माैन बाळगले आहे. आजवर विविध तज्ज्ञांच्या समित्या, पाटबंधारे विभागाने सादर केलेले अहवालही धूळखात पडून आहेत. त्यामुळे महापूर आला की तात्पुरत्या उपाययोजना करण्यातच यंत्रणांनी धन्यता मानली आहे.सांगली शहरात आजही नाल्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई केली जाते. नाल्यांच्या बफर झोनमध्ये, ओतात, पूरपट्ट्यात महापालिकेच्या परवानगीशिवाय जी बांधकामे उभी राहताहेत त्यांना राजकीय लोकांचा आश्रय लाभला आहे. काही आजी-माजी नगरसेवकांनीही मोठमोठे गृहप्रकल्प या क्षेत्रात उभारले आहेत. सध्या हरीपूर रोडवरील नाल्याशेजारी तसेच जुना कुपवाड रोड, विजयनगर येथील नाल्यांच्या बफर झोनमध्ये राजकीय लोकांच्या अट्टहासापोटी बांधकामे केली जात आहेत. लोकांचा विरोध डावलून ही बांधकामे होत असताना शासकीय यंत्रणा त्याकडे कानाडोळा करताना दिसताहेत.

पोकळ घोषणा

तत्कालीन मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी सांगलीत येऊन महापुराची पाहणी केल्यानंतर पूरपट्ट्यातील नागरी वस्त्यांचे स्थलांतर, नाले, ओतातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई याबाबत आक्रमक भूमिका मांडली होती. कालांतराने त्यांच्या या घोषणा हवेत विरल्या. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याचे अतिक्रमण असले तरी ते हटविले जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता. प्रत्यक्षात एकही अतिक्रमण हटले नाही.

समित्यांचे अहवाल नावालाचपुराची कारणीमीमांसा करताना वडनेरे समितीने पूरप्रवण क्षेत्रात नागरीकरण, बांधकामे, अतिक्रमणे यांच्यामुळे पूर प्रवाहास अडथळे व नदीपात्राचे झालेले संकुचीकरण कारणीभूत असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यांच्या अहवालात हे अडथळे दूर करण्याची शिफारसही केली होती. वडनेरे समितीपूर्वी तत्कालीन सरकारांनी महापुराच्या काळात समित्या नेमल्या, पण त्यांच्या अहवालावर कोणतेही काम केले नाही.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर