शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

"एन्काऊंटर करा.. माणसाचा नाही, मानसिकतेचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 18:17 IST

literature SangliNews- "एन्काऊंटर करा, माणसाचा नाही मानसिकतेचा! माणूस वाचला पाहिजे, समतेचा मार्ग टिकवण्यासाठी" यासह अनेक बहारदार काव्यांनी प्रसिद्ध कवी, लेखक, दिग्दर्शक हृदयमानव अशोक यांची मैफील सांगलीत रंगली.

ठळक मुद्दे"एन्काऊंटर करा.. माणसाचा नाही, मानसिकतेचा... श्रावस्ती बुद्धीविहारात रंगली 'काव्यमैफिल हृदयमानवाची'

सांगली : "एन्काऊंटर करा, माणसाचा नाही मानसिकतेचा! माणूस वाचला पाहिजे, समतेचा मार्ग टिकवण्यासाठी" यासह अनेक बहारदार काव्यांनी प्रसिद्ध कवी, लेखक, दिग्दर्शक हृदयमानव अशोक यांची मैफील सांगलीत रंगली.संजयनगर येथील श्रावस्ती बुद्धविहाराच्यावतीने काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. कविता बुद्ध तत्त्वज्ञानाच्या, मानवतेच्या, बाबासाहेबांच्या विचारांच्या, समतेच्या आणि माणुसकीच्या. आदी विषयांवरील बहारदार आणि माणूस जोडणाऱ्या कवितांचं यावेंळी सादरीकरण करण्यात आलं.

'एन्काऊंटर करा' या कवितेने उस्थितांची मन जिंकली. मानवतेच्या वाटेवर चालताना आपला माणूस वाचवून मानसिकता संपवण्याचे आवाहन या कवितेतून करण्यात आले."कस्टडी खोला मायबाप होआपणच डांबून ठेवलेल्याप्रकांड पंडितांचीते आक्रन्दताहेत मुक्यानेबाहेर येण्यासाठी"यासारख्या कवितेतून महापुरुषांच्या विचारांना मुक्त करून सकल मानवजातीसाठी एकत्रित आलं पाहिजे असं सांगण्यात आलं."मधलं बोटदाखवलं पाहिजेघोळक्या घोळक्यानेढेकळातल ढेकळं न कळणाऱ्यांना"या कवितेतून शेतकरी आंदोलनाला समर्थन तर विरोध करणाऱ्यांवर ताशेरे त्यांनी ओढले."राजे,तुम्हाला कॉपी करू पाहणाऱ्यावाढलेल्या दाढ्या कुरवळल्या गेल्यातकाही दिवसांपूर्वी मोसमाततुमच्या मुद्राप्रस्थ गडकिल्ल्यांवर"या शिवरायांचं समरण करून वाहवत गेलेल्या पिढीला समज देणाऱ्या कवितेतून प्रबोधन करण्यात आले.'ग्लोबल आंबेडकर', 'माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे', 'ग्रंथालयात जायचं पुस्तकांना घ्यायचं', 'तुझ्यात फक्त दम पाहिजे', 'तू फक्त तू आहेस', 'पुतळे, दहशतवादाचे टेंडर', आदी मेंदूला जाग आणणाऱ्या कविता यावेळी सादर करण्यात आल्या. अभ्यासू रसिकांनी यास भरभरुन दाद दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नामदेव कस्तुरे होते. ते म्हणाले समाजाने कलाकारांना जोपासले पाहिजे. सर्वार्थाने त्यांंच्या पाठिशी राहिले पाहिजे. समाजपरिवर्तन शक्य होईल. हृदयमानव अशोक या तरुण कवीच्या कविता म्हणजे वर्तमान समाज सामस्यांवर घाव घालण्याची व त्यातून नवी वाट दाखविण्याची क्षमता असणाऱ्या कविता आहेत.यावेळी डॉ जगन कराडे, डॉ रविंद्र श्रावस्ती, सुधीर कोलप,  दयानंद कोलप, डॉ सोनिया कस्तुरे आदी उपस्थित होते. प्रा. अशोक भटकर यांनी सूत्रसंचलन केले. चंद्रकांत नागवंशी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला तर संजीव साबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन सोनुताई कांबळे , प्रा.अशोक भटकर,अरुण कांबळे, पवन वाघमारे ,दिपक कांबळे आदींनी केले.

टॅग्स :literatureसाहित्यSangliसांगली