शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरसी’विरोधात पुरोगामींचा एल्गार- सांगलीतील बैठकीत व्यापक लढ्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 01:19 IST

आंदोलनाच्या नियोजनासाठी समिती गठित करण्यात आली आहे. तरुणांमध्ये जागृतीसाठी शिबिरेही घेण्याचे ठरले. यातील जिल्हास्तरीय शिबिर सांगलीत ११ जानेवारीस घेण्यात येणार आहे. सर्व पुरोगामी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन लढा तीव्र करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंपूर्ण जिल्हाभरात उठाव करणार : सर्वोच्च न्यायालयात याचिकेचा निर्णय,

सांगली : नागरिकत्व नोंदणी आणि संशोधन कायद्याविरोधात पुरोगामी कार्यकर्ते एकवटले आहेत. सोमवारी सांगलीत झालेल्या व्यापक बैठकीत जिल्हाभरातून उठावाचा निर्णय झाला. राज्यभरातील पुरोगामी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्याचे ठरले.

बैठकीला ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रा. नामदेव करगणे, धनाजी गुरव, मन्नान शेख, दिग्विजय पाटील, हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम, मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, अ‍ॅड. आर. बी. कोकाटे, प्रभाकर सनमडीकर, डॉ. दीपा श्रावस्ती आदी उपस्थित होते.धनाजी गुरव म्हणाले, ‘सध्या देशभरात मी म्हणेल तो कायदा, अशी ठोकशाही सुरू आहे. नागरिकत्वाच्या कायद्याने भारतीय संविधानालाच आव्हान दिले आहे, तो हाणून पाडला पाहिजे. कायद्याच्या जोरावर जातीजातीत व धर्मा-धर्मात फूट पाडली जात आहे. निधर्मी देशाची वाटचाल हिंदुत्वाकडे सुरू आहे. त्याला वेळीच रोखण्याची जबाबदारी सुजाण विचारवंतांसह सजग नागरिकांचीही आहे. प्रसंगी कायद्याचाही आधार घेऊ. विकास मगदूम म्हणाले, सर्व पुरोगामी पक्षांना सोबतीला घेऊन उठाव केल्याशिवाय हा अन्याय थांबणार नाही.

प्रा. गौतमीपुत्र कांबळे, विकास मगदूम, चंद्रकांत लोंढे, डॉ. संजय पाटील, नामदेव करगणे आदींनीही भूमिका मांडल्या. बैठकीतील निर्णय असे : या कायद्याला सविनय कायदेभंग पद्धतीने विरोध करायचा. जिल्हास्तरीय भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, त्याचा संभाव्य दिवस २५ जानेवारी असेल.आंदोलनाच्या नियोजनासाठी समिती गठित करण्यात आली आहे. तरुणांमध्ये जागृतीसाठी शिबिरेही घेण्याचे ठरले. यातील जिल्हास्तरीय शिबिर सांगलीत ११ जानेवारीस घेण्यात येणार आहे. सर्व पुरोगामी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन लढा तीव्र करण्यात येणार आहे. बैठकीला शिवाजी त्रिमुखे, रोहित शिंदे, राजू कांबळे, हनीफ ताशिलदार, नईम शेख उपस्थित होते.

 

  • ...तर शिवसेनेलाही सोबत घेणार

धनाजी गुरव म्हणाले, जो कायदा संविधानाविरोधात आहे, तो आम्हालाही मान्य नाही. त्याच्या रक्षणासाठी सविनय कायदेभंग मार्गांनी विरोध करू. प्रत्येक गावातील पन्नास कार्यकर्र्ते ही चळवळ आपापल्या गावात पुढे नेतील. या लढ्यात शिवसेना सोबतीला आली तर, त्यांचीही मदत घेऊ.

सांगलीत पुरोगामी कार्यकर्त्यांच्या बैठकीत धनाजी गुरव यांनी ‘नागरिकत्व संशोधन व नोंदणी कायद्या’विषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. गौतमीपुत्र कांबळे, धनाजी गुरव, विकास मगदूम, नामदेव करगणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप