शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अकरा महिन्याच्या मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 18:23 IST

leopard Sangli Shirala- तडवळे ( ता.शिराळा) येथे भर दुपारी बारा च्या दरम्यान ऊस तोड कामगारांच्या अकरा महिन्याच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.सुफीयान शमशुद्दीन शेख (रा. आनंदगाव ,ता.माजलगाव ,जि बीड) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे.

ठळक मुद्दे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अकरा महिन्याच्या मुलाचा मृत्यू वनविभागामार्फत या कुटुंबाला १५ लाख रुपयांची मदत जाहीर

शिराळा: तडवळे ( ता.शिराळा) येथे भर दुपारी बारा च्या दरम्यान ऊस तोड कामगारांच्या अकरा महिन्याच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सुफीयान शमशुद्दीन शेख (रा. आनंदगाव ,ता. माजलगाव ,जि बीड) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे.

या घटनेमुळे नागरिक, शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. वनविभागामार्फत या कुटुंबाला १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.याबाबत घटनास्थळावरून तसेच वनविभागाकडून मिळलेली माहिती अशी की, या गावाच्या सिद्धेश्वर मंदिराजवळील अंत्रीच्या शिवारातील कृष्णात शामराव पाटील यांच्या शेतातील उसाला तोड आली होती. यासाठी शमशुद्दीन शेख यासह पाच कुटुंबातील महिला पुरुष ऊस तोड करत होते.या ठिकाणी सुफीयान यासह दोन इतर मुलांना बसविले. सुफीयान याला ऊसाच्या बारक्या कांड्या करून खाण्यास दिल्या. इतर दोन मुले थोडी मोठी असल्याने ते इतरत्र खेळत होती. दुपारी बाराच्या दरम्यान शेजारी ऊसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने संधी साधून सुफीयान याच्या नरड्याला पकडून उसात धूम ठोकली ही घटना सुफीयानच्या वडिलांनी पहिली व त्यांनी आरडाओरडा केला.

यावेळी सर्वच ऊस तोड कामगारांनी बिबट्याचा पाठलाग केला. यामुळे तीनशे फुटावर बिबट्या बालकाला टाकून पळून गेला. या जखमी बालकाला ऊसतोड कामगारांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले मात्र त्याचा मृत्यू झाला होता.याबाबत पोलीस पाटील वैशाली पाटील यांनी पोलीस ठाण्यात वर्दी दिली.या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय येथे नागरिकांनी गर्दी केली. आमदार मानसिंगराव नाईक , तहसीलदार गणेश शिंदे , उपवनसंरक्षक पी बी ढाणके , वनसंरक्षक चंद्रकांत देशमुख , देवकी ताहसिलदार , प्रकाश पाटील , बाबा गायकवाड , संपत देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :leopardबिबट्याSangliसांगलीshirala-acशिराळा