शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त शेतकऱ्यांना वीजबिलाचा ‘शॉक’, मोटारी घरात, बिले दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 14:48 IST

महापुराने उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विजबिलाचा शॉक बसला आहे. समडोळी (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी जून महिन्यापासून पाण्याच्या मोटारी घरात ठेवल्या असताना अचानक महावितरण कंपनीने सहा महिन्यांची दोन हप्त्यातील सुमारे ८0 ते ९0 हजार रुपयांची बिले शेतकऱ्यांना धाडली आहेत. मोटारी घरात असताना वीजबिले दारात आल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्त शेतकऱ्यांना वीजबिलाचा ‘शॉक’, मोटारी घरात, बिले दारातसमडोळीतील शेतकऱ्यांमधून महावितरणबद्दल संताप

सांगली : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विजबिलाचा शॉक बसला आहे. समडोळी (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी जून महिन्यापासून पाण्याच्या मोटारी घरात ठेवल्या असताना अचानक महावितरण कंपनीने सहा महिन्यांची दोन हप्त्यातील सुमारे ८0 ते ९0 हजार रुपयांची बिले शेतकऱ्यांना धाडली आहेत. मोटारी घरात असताना वीजबिले दारात आल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला आहे.समडोळी येथील शेतकरी सूर्यकांत बाळासाहेब मगदुम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महापुराच्या काळात विजेच्या मिटरबाबत महावितरणनेच निर्णय घ्यायला हवा होता. शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगत शेतीतील पाण्याच्या मोटारी घरात नेऊन सुरक्षित ठेवल्या. जूनपासून या मोटारी अद्यापही घरातच आहेत. दुसरीकडे महापुराच्या काळात दोन महिने व त्यानंतरही अवकाळी पावसामुळे दोन महिने शेतीची कामेच करता आली नाहीत.

वीजेचा वापरही केला गेला नाही. सहा महिने शेतकऱ्यांना शेतीपासून दूर रहावे लागले असताना अचानक आलेल्या या भरमसाठ बिलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. महावितरणने बंद असलेल्या मीटरचे कसे रिडिंग घेतले आणि बिलाची कशी आकारणी केली, हा संशोधनाचा विषय आहे.समडोळी येथील सुभाष बापुसो खोत, सुधीर बापुसो खोत, रवींद्र पाटील आदी शेतकऱ्यांनाही अशी भरमसाठ बिले आली आहेत. अगोदरच वीजेच्या दराने हैराण असलेल्या शेतकऱ्यांचे वापराविना आलेल्या बिलामुळे कंबरडे मोडले आहे. महावितरण कंपनीने या विजबिलांबाबत तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही याविरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा मगदुम यांनी दिला आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणSangliसांगली