शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील वीज ग्राहक झाला हायटेक, महिन्यात १०८ कोटीचे वीजबिल भरले ऑनलाइन

By अशोक डोंबाळे | Updated: July 8, 2023 17:10 IST

‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क

सांगली : जिल्ह्यातील सर्व प्रकाराच्या दोन लाख चार हजार वीज ग्राहकांनी जून २०२३ या महिन्यात १०८ कोटी रुपयांचे वीजबिल ऑनलाइन भरले आहे. ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून वेळोवेळी प्रोत्साहन दिले जात आहे, याचाच फायदा महावितरण कंपनी आणि वीज ग्राहकांना होताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील ६५ टक्के वीज देयकांची रक्कम ग्राहकांकडून ऑनलाइनद्वारे भरणा केली जात आहे.जून २०२३ या महिन्यात सर्व प्रकाराच्या दोन लाख चार हजार वीज ग्राहकांनी चक्क १०८ कोटी रुपये ऑनलाइन भरले आहेत. तसेच दोन लाख ६० हजार ग्राहकांनी ४६ कोटी ११ लाख रुपये ऑफलाइन भरले आहेत. मे २०२३ या महिन्यात दोन लाख आठ हजार वीज ग्राहकांनी १०० कोटी रुपये भरणा केला आहे. तसेच दोन लाख ३० हजार ग्राहकांनी ३३ कोटी रुपये ऑफलाइन भरले आहेत.एप्रिल २०२३ या महिन्यात एक लाख ६८ हजार वीज ग्राहकांनी ८० कोटी ४६ लाख रुपये ऑनलाइन भरले असून एक लाख ५७ हजार ग्राहकांनी १८ कोटी चार लाख रुपये ऑफलाइन भरले आहेत. ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के तर वीजबिलाचे पैसे तात्काळ भरल्यास१ टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क आहे. 

वीज ग्राहकांनी या सेवेचा केला वापरनेटबँकिंग, क्रेडिट अथवा डेबिट कार्डसह मोबाइल वॉलेट व कॅश कार्ड्सचा उपयोग करून वीजबिलाचा ऑनलाइन भरणा केला आहे. हेच पर्याय वापरून महावितरणच्या मोबाइल ॲपवरून काही ग्राहकांनी वीजबिल भरणा केला आहे. भीम ॲप किंवा इतर कोणत्याही पेमेंट वॅलेटच्या माध्यमातून वीजबिलाचा भरणा करणे सुलभ व सुरक्षित आहे. ऑनलाइन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वेळ व पैशांच्या बचतीची सुविधा महावितरणने दिली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीelectricityवीजmahavitaranमहावितरण