इस्लामपूर : व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था संचलित नानासाहेब महाडीक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधील विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत महावितरणच्या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, विश्रामबाग सांगली यांच्यावतीने विद्युत सुरक्षा व अपघात बचाव याबाबत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विद्युत अपघात कोणत्या प्रकारे होवू शकतात व त्यापासून बचाव कसा केला जातो. याबाबत माहिती देण्यात आली. याचबरोबर विद्युत अपघात होवू नयेत यासाठी काय काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता एच. डी. ताम्हणकर, उपकार्यकारी अभियंता आर. जी. वायदंडे व एस. जी. जोशी तसेच प्राचार्य एन. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षणामध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागातील १०५ विद्यार्थी सहभागी झाले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश जोशी, उपप्राचार्य सी. बी. पाटील तसेच विभागप्रमुख महेश जांभळे उपस्थित होते. प्रा. ए. आर. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. एच. पाटील यांनी आभार मानले.