शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

तरुणाई अडकली नशेच्या विळख्यात! अंमली पदार्थ विरोधी दिन

By admin | Updated: July 28, 2014 23:22 IST

गांजाची तस्करी : झंडूबाम, स्पिरीटचा नशेसाठी वापर, व्यापक जनजागृतीची गरज

सचिन लाड -सांगली ,,अपघातात बळी पडणारे, गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्यांमध्ये २० ते ३० वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डवरुन दिसून येते. नशेत भरधाव वेगाने वाहन चालविणे, चैनीसाठी गुन्हेगारीचा प्रवास निवडणे, अशी कारणे पुढे येत असल्याने तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकली असल्याचे चित्र आहे. या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढणे कठीण असून, यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. जत, शिराळा तालुक्यांमध्ये असलेली गांजाची शेती उघडकीस आली होती. जत तालुक्यातील कर्नाटकच्या सीमेवर अजूनही गांजाच्या झाडांची लागवड होत आहे. जतमधून कर्नाटकात, तर कर्नाटकातून मिरजेत गांजाची तस्करी होत आहे. विशेषत: ख्वाजा वस्तीमध्ये गांजाची विक्री खुलेआम होत आहे. यासाठी साखळी कार्यरत आहे. शंभर रुपयांना दहा ग्रॅमपर्यंतचा गांजा प्लॅस्टिकच्या पाकिटामध्ये विक्री करण्यात येत आहे. गांजाच्या विक्रीसाठी लहान मुलांचाही वापर करण्यात येत आहे. तीन वर्षांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली होती. त्यानंतर सांगली जिल्ह्यात हेरॉईन, कोकेन, ब्राऊन शुगर आदी मादक पदार्थ सापडलेले नाहीत. सांगली परिसरात त्याची विक्री होत असल्याचे वृत्तही नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. मादक पदार्थांना बळी पडलेले रुग्णही अद्याप आपल्या परिसरात नाहीत.झंडूबाम, स्पिरीट अन् नशेच्या गोळ्यातरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. पानपट्टीवर गुटखा, मावा, दारू, सिगारेट यासाठी तरुणांची गर्दी दिसते. बोलताना तोंडातून याची दुर्गंधी येऊ नये, यासाठी काही तरुण झंडूबाम, स्पिरीट व नशेच्या गोळ्या सेवन करीत आहेत. बंद पडलेल्या शाळा किंवा निर्जन ठिकाणं तरुणांच्या टोळक्यांनी नशेचा अड्डा बनविला आहे. झंडूबाम रुमालावर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात. यातून त्यांना नशा येते. स्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जात आहे. मेडिकलमधून नशेच्या गोळ्या खरेदी केल्या जात आहेत.गुटखा, मावा बंदी कागदावरच४राज्य शासनाने गुटखा व मावा विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र आजही पानपट्टीवर त्याची खुलेआम विक्री सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. सुगंधित तंबाखू सहजपणे उपलब्ध होत असल्याने त्याचा मावा तयार करण्याची वापर केला जात आहे. गुटख्याची चोरुन विक्री केली जात असली तरी, मावा कोणत्याही पानपट्टीत सहजपणे मिळतो. तो सेवन करणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे गेल्या काही महिन्यात दहा रुपयाला मिळणाऱ्याा माव्याची ४० रुपये दराने विक्री केली जात आहे.गांजा विक्रीचा अड्डामिरजेतील रेल्वे स्टेशन व बसस्थानक परिसरात गांजा विकणारी टोळी सक्रिय आहे. कर्नाटकातील विजापूर व ओरिसा राज्यातून गांजाची तस्करी केली जात असल्याचे समजते. दहा ते वीस ग्रॅमच्या पुडीतून गांजाची विक्री केली जात आहे. बशीर, आसाद, बिल्ली, खुशबू या टोपण नावाने गांजाची विक्री सुरु आहे. यातील बिल्ली नावाच्या महिलेला गांजा विक्रीप्रकरणी न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. जिल्ह्यात या पदार्थांची तस्करी होत नाही. गांजाची विक्री होत असल्याची माहिती आहे. खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर गांजाच्या शेतीवर तसेच विक्री अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली जात आहे. यासंदर्भात अधिक माहिती असल्यास नागरिकांनी संपर्क साधून माहिती दिली पाहिजे. - दिलीप सावंत, जिल्हा पोलीसप्रमुख, सांगली.अंमली पदार्थांचे कोणतेही सेवन असो, त्याने मेंदूमध्ये डोकामाईन नावाचे रसायन तयार होते. हे रसायन व्यसनी माणसाच्या मनात कृत्रिम आनंद निर्माण करते. यातून त्यांना नैसर्गिक आनंदाची ओढ कमी होते. प्रयत्न करूनही व्यसन सोडवत नाही. यातून आर्थिक, नैतिक व शारीरिक नुकसान होते. यामुळे व्यसनाची सुरुवातच न करणे महत्त्वाचे आहे. - डॉ. चारुदत्त कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ, सांगली.