शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

 अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला आठ वर्षे सक्तमजुरी; सांगली न्यायालयाचा निकाल, आरोपी मिरजेचा

By शीतल पाटील | Updated: October 30, 2023 20:17 IST

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड काढणाऱ्याला तरुणाला सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एच. हातरोटे यांनी आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

सांगली: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड काढणाऱ्याला तरुणाला सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एच. हातरोटे यांनी आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. प्रवीण सुरेश सन्नके (२८, रा. मालगाव रोड, दत्त काॅलनी, मिरज) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, आरोपी प्रवीण सन्नके हा पिडीत मुलीचा पाठलाग करून तु मला आवडतेस, असे म्हणून तिच्या भावाला ठार मारण्याची व स्वत: आत्महत्या करण्याची धमकी देत होता. वारंवार पाठलाग करून तिची छेडछाडही काढत होता. पिडीत मुलीच्या आईने याबाबत मिरज शहर पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी पोक्सोतर्गंत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

सहाय्यक निरीक्षक आय. एस. वर्धन यांनी या प्रकरणाचा तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी युक्तीवाद केला. आरोपीला यापूर्वीही पोक्सोतर्गंत गुन्ह्यात दहा वर्षाची शिक्षा झाली होती. त्याच्यावर इतर गुन्हेही दाखल आहेत. त्यामुळे आरोपीला सहानभूती दाखवू नये, असा युक्तीवाद केला. न्यायालयाने आरोपी प्रविण याला दोषी धरून आठ वर्षे सक्तमजुरी व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील सहा हजार रुपये पिडीत मुलीला देण्याचे आदेशही दिले. या खटल्यात मिरज पोलिस ठाण्याकडील शशिकांत पाटील, पैरवी कक्षातील सुनीता आवळे, रेखा खोत यांनी मदत केली.

टॅग्स :Sangliसांगली