शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बस्तवडे स्फोटप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:23 IST

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शेतमालक संभाजी सदाशिव चव्हाण, मनीषा संभाजी चव्हाण, संग्रामसिंह संभाजी चव्हाण, पृथ्वीराज संभाजी चव्हाण (अपाक आई मनीषा) ...

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शेतमालक संभाजी सदाशिव चव्हाण, मनीषा संभाजी चव्हाण, संग्रामसिंह संभाजी चव्हाण, पृथ्वीराज संभाजी चव्हाण (अपाक आई मनीषा) (सर्व. रा. सिद्धेवाडी, ता. तासगाव), शिवशक्ती कन्स्ट्रक्शनचे मोहन कलाय्या जंगम (रा. नेमिनाथनगर, सांगली), प्रतीक मन्नत स्वामी, ईश्‍वर बामणे, महेश शिवाप्पा दुडणावर या आठ जणांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद सहायक पोलीस निरीक्षक नितीन केराम यांनी दिली आहे.

बस्तवडे येथील गट नं. ३७७ मधील जमीन सिद्धेवाडी येथील संभाजी चव्हाण यांनी स्वतःसह कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर खरेदी केली होती. गेल्या काही महिन्यांपासून या डोंगराचे सपाटीकरण करून जमीन तयार करण्याचे काम सुरू आहे. या सपाटीकरणासाठी ब्रेकर, जेसीबी, डंपर, बोअर ब्लास्टिंगच्या यंत्राचा वापर करण्यात येत आहे. सुमारे ४० हून अधिक मजूर काम करीत आहेत. संभाजी चव्हाण यांनी या कामाचा ठेका शिवशक्ती कन्स्ट्रक्शनचे मोहन जंगम यांना दिला आहे.

बोअर घेत असताना गाडीचा कॉम्प्रेसर गरम झाल्याने या गाडीचा, तसेच डिझेल टाकी व गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर शेजारी उभ्या असणाऱ्या दुसऱ्याही गाडीचा स्फोट झाला. या स्फोटात प्रतीक स्वामी व ईश्वर बामणे या दोघांचा बळी गेला, तर महेश दुडणावार व उपेंद्र यादव हे दोघेजण जखमी झाले.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी स्फोटकांचे १३ नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवून, नेमका स्फोट कशामुळे झाला, याचा तपास होणार आहे. शिवाय स्फोट झालेल्या क्षेत्राभोवती पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दोघा मृतांवरही गुन्हा दाखल

बस्तवडे येथील गट नं. ३७७ मध्ये बेकायदेशीररित्या जिलेटिन व अन्य स्फोटकांचा वापर करून डोंगराला सुरुंग लावल्याप्रकरणी तब्बल ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोघा मृतांचाही समावेश आहे. ईश्‍वर बामणे आणि प्रतीक स्वामी अशी या दुर्घटनेत ठार झालेल्यांची नावे आहेत. या दोघांवरही मृत्यूनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी फरार

याप्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोन आरोपींचे निधन झाले आहे, तर इतर सहा आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.