शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

सांगली जिल्ह्यात आठ बसेस फोडल्या

By admin | Updated: June 9, 2014 00:57 IST

आक्षेपार्ह छायाचित्राचे पडसाद : ‘रास्ता रोको’ करून निषेध; एक जखमी; जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद

सांगली : फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध झाल्याचे पडसाद रविवारी सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी उमटले. दिवसभरात आठ एसटी बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या. रास्ता रोको, गाव बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध करण्यात आला. सांगलीत हुल्लडबाजांवर पोलिसांनी लाठीमार केला. सांगलीत विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शास्त्री चौकात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निषेध सभा घेतली. त्यावेळी शांततेचे आवाहनही करण्यात आले. त्यानंतर मोटारसायकल रॅली काढून शहर बंदचे आवाहन केले. शांततेचे आवाहन न जुमानता हुल्लडबाजी करणाऱ्या काही तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला. दिवसभर सांगलीत तणावपूर्ण शांतता होती. मुख्य बाजारपेठेसह शहरात सर्वत्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील विष्णुअण्णा फळ मार्केटसमोर देवगड-अक्कलकोट एसटीवर अज्ञातांनी दगडफेक केली. राम मंदिर कॉर्नरवर अंजनी-सांगली या एसटीवर दहा ते बारा अज्ञातांनी दगडफेक केल्याने चालक शिवाजी सखाराम नलावडे (वय ५५, रा. सांगली) हे जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल चौकात विश्रामबाग-पुणे या आराम बसवर तसेच तासगाव-सांगली एसटीवर दगडफेक करण्यात आली. मारुती चौकातील बँक आॅफ इंडियाच्या एटीएमवर तसेच काही बंद दुकानांवर दगडफेक झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मिरजेत वखारभाग व एसटी डेपोसमोर दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली. आरपीआय व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला. इस्लामपुरात ठिकठिकाणी रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला. शहर बंदचे आवाहन केल्यानंतर दुपारपासून भाजी बाजार वगळता इतर सर्व व्यवहार बंद होते. डॉ. आंबेडकरनगर येथे अज्ञातांनी एका ट्रकचालकास मारहाण केली. कारखाना रस्त्यावरील एका एसटीवरही दडगफेक करण्यात आली. विट्यातील कुंडल रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको केल्याने दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. जतमध्ये सर्वपक्षीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एका एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. ठिकठिकाणी टायर पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला. कवठेमहांकाळमध्ये आरपीआयच्यावतीने निषेध फेरी काढण्यात आली. कडेगावमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करण्यात आला. तासगावमध्ये आरपीआय कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला. (प्रतिनिधी)