सुरुल (ता. वाळवा) येथे सभापती शुंभागी पाटील यांचा मुख्याध्यापिका शांता पाटील यांनी सत्कार केला. यावेळी अमोल पाटील, कुंदाताई पाटील आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : समाजाचे भविष्य शिक्षकांच्या हातात आहे. शिक्षणातून विकासाचे परिवर्तन घडत असते. गेली दीड वर्षे कोरोना संसर्गामुळे शाळा सुरू नसल्याने मुले अभ्यासापासून वंचित असल्याचे मत पंचायत समितीच्या सभापती शुभांगी पाटील यांनी व्यक्त केले.
सुरूल (ता. वाळवा) येथे कोरोना काळातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी ‘माझं गाव शैक्षणिक पोस्टरचं गाव’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
पाटील म्हणाल्या, शाळेच्या मुख्याध्यापिका शांता पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी हसत खेळत विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवणारा उपक्रम राबवून एक आदर्श घालून दिला आहे. हा संपूर्ण उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आला.
या उपक्रमासाठी रेठरेधरण गावचे सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांनी २५ हजार रुपयांचे शैक्षणिक डिजिटल बॅनर देऊन शाळेला भरघोस शैक्षणिक मदत केली.
यावेळी सरपंच कुंदाताई पाटील, उपसरपंच जगन्नाथ पाटील, नामदेव पाटील, प्रकाश पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी छायादेवी माळी, सुनील आंबी, अरुण बंदसोडे, अमोल जाधव, मुख्याध्यापिका शांता पाटील आदी उपस्थित होते.