शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण कमी झाले म्हणून, स्वत:ला कमी लेखू नका : धनंजय दातार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:33 IST

अभ्यासात मी कच्चा होतो. दहावीत गणित विषयात पाचवेळा नापास झालो. सहाव्यांदा मात्र रात्रंदिवस अभ्यास करून पास झालो. आज उद्योगात डॉक्टरेट मिळविली. शिक्षण कमी झाले म्हणून स्वत:ला कमी लेखू नका.

ठळक मुद्देसर्वसाधारण माणूस उद्योगात यशस्वी ठरू शकतो; सांगलीत रोटरीतर्फे मुलाखत

सांगली : अभ्यासात मी कच्चा होतो. दहावीत गणित विषयात पाचवेळा नापास झालो. सहाव्यांदा मात्र रात्रंदिवस अभ्यास करून पास झालो. आज उद्योगात डॉक्टरेट मिळविली. शिक्षण कमी झाले म्हणून स्वत:ला कमी लेखू नका. सर्वसाधारण माणूसही उद्योगात यशस्वी ठरू शकतो, असे प्रतिपादन दुबईतील अल्-अदिल कंपनीचे संचालक तथा ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी गुरुवारी केले.सांगलीत रोटरी क्लबच्यावतीने आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी वंदना दातार, रोटरीचे अध्यक्ष सुभाष कुंटे, अजय शहा, भास्कर ताम्हणकर, उदय पाटील उपस्थित होते. श्वेता गानू यांनी डॉ. दातार यांची मुलाखत घेतली.

दातार म्हणाले की, अकोल्यात आजीकडे माझे शिक्षण झाले. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने अनेक अडचणी आल्या. पायात चप्पल नाही, शाळेसाठी एकच गणवेश होता. पावसाळ्यात गोणपाट अंगावर घेऊन शाळेत जात होतो. अभ्यासात मी कच्चा होतो. कुणी टक्केवारी विचारली, तर आजही मी ‘पास झालो’ इतकेच सांगतो. वडील दुबईत कामासाठी गेले होते. त्यांना मदत करण्यासाठी मीही दुबईत गेलो. एका छोट्या किराणा मालाच्या दुकानापासून उद्योगाची सुरूवात केली.

सुरुवातीला मोठे नुकसान झाले. पैसे बुडाले. आईचे दागिने विकून पुन्हा व्यवसाय सुरू केला. १६ तास काम केले. अखेर व्यवसायात यश मिळत गेले. त्यातून ‘अल्-अदिल ट्रेडिंग कंपनी’मार्फत संपूर्ण अरब अमिरातीमध्ये व्यापार पसरला आहे. याशिवाय तुळजा एक्स्पोर्ट इंडियामार्फत पिकॉक ब्रँड या नावाखाली मसाल्याची उत्पादनेही जगभरात जातात, असे त्यांनी सांगितले.रोटरीतर्फे डॉ. दातार यांना मानपत्र देऊन सत्कार केला. अध्यक्ष सुभाष कुंटे यांनी स्वागत केले, तर मानपत्राचे वाचन अजय शहा यांनी केले.माझ्यासाठी सांगली ‘लकी’सांगलीतच वंदना देशपांडे या मुलीशी माझा विवाह झाला. विवाहावेळी दुबईत छोटे दुकान होते. आज यशस्वी उद्योजक होण्यात पत्नीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सांगली माझ्यासाठी ‘लकी’ ठरली आहे, असे दातार म्हणाले.

टॅग्स :businessव्यवसायSangliसांगलीRotary Clubरोटरी क्लब